शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
2
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
3
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
4
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
5
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
6
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
7
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
8
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
9
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
10
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
11
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
12
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
13
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
14
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
15
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
16
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
17
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
18
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
19
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
20
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 21:09 IST

Russia Ukrain War: युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात भारतीय कामगाराचा मॉस्कोमध्ये मृत्यू

Ukrainian Drone Attack: रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या चार वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या युद्धाची भीषण झळ आता भारतालाही बसली आहे. रविवारी रशियाची राजधानी मॉस्कोला लक्ष्य करून युक्रेनने केलेल्या एका मोठ्या ड्रोन हल्ल्यात एका भारतीय कामगाराचा मृत्यू झाला असून, अन्य तीन भारतीय कामगार गंभीर जखमी झाले आहेत. रशियातील भारतीय दूतावासाने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.

भारतीय दूतावासाकडून तातडीने मदत कार्य सुरू

या भीषण घटनेची माहिती मिळताच भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. तसेच रुग्णालयात जाऊन जखमी भारतीय कामगारांची विचारपूस केली. भारतीय दूतावासाने एक्सवर माहिती देताना म्हटले आहे की,"या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल दूतावास तीव्र दुःख व्यक्त करत आहे. पीडित भारतीय कामगारांना आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी आम्ही संबंधित कंपनीचे व्यवस्थापन आणि रशियातील स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहोत." सुरक्षेच्या कारणास्तव मृत आणि जखमी भारतीय नागरिकांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.

एकाच रात्री १,००० हून अधिक ड्रोन डागले

युक्रेनने शनिवारी मध्यरात्रीपासून रशियाविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रोन मोहीम उघडली. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत रशियन हवाई दलाने देशभरात युक्रेनचे तब्बल १,००० हून अधिक ड्रोन पाडले किंवा निकामी केले.

मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी सांगितले की, एकट्या मॉस्को शहराच्या दिशेने येणारे किमान ८१ ड्रोन एअर डिफेन्स सिस्टमने हवेतच पाडले. मात्र, या ड्रोनचे अवशेष निवासी इमारती आणि पायाभूत सुविधांवर कोसळल्याने मोठी हानी झाली. मॉस्कोच्या एका तेल शुद्धीकरण कारखान्या जवळही काही ड्रोन कोसळले, मात्र कारखान्याचे मोठे नुकसान झाले नसून तो सुरक्षित असल्याचे प्रशासनाने सांगितले.

निवासी भागांना फटका; मृतांचा आकडा वाढला

या ड्रोन हल्ल्यांमुळे मॉस्को आणि आसपासच्या परिसरात प्रचंड स्फोट झाले असून हवाई हल्ल्याचे सायरन वाजू लागले. रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये तीन जण मॉस्को परिसरातील तर एक जण युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या बेलगोरोड भागातील आहे. खिम्की भागात घरांवर ड्रोनचे अवशेष पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, तर पोगोरेल्की गावात दोन पुरुषांचा जीव गेला.

रशियन हल्ल्यांना युक्रेनचे सडेतोड उत्तर

काही दिवसांपूर्वीच रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर युद्धाच्या इतिहासातील सर्वात मोठा हवाई हल्ला केला होता. या पार्श्वभूमीवर, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला होता. झेलेन्स्की यांनी एक व्हिडिओ शेअर करत या ड्रोन हल्ल्यांचे समर्थन केले आहे. "रशियाने आमच्या शहरांवर आणि निष्पाप नागरिकांवर केलेल्या हल्ल्यांना हे आमचे उत्तर आहे," असे झेलेन्स्की म्हणाले. रशियाच्या भक्कम सुरक्षा यंत्रणेला भेदून युक्रेनचे ड्रोन रशियन सीमेच्या आत ५०० किलोमीटरपर्यंत घुसले असल्याचा दावाही त्यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Ukraine Drone Attack on Moscow Kills Indian Worker, 3 Injured

Web Summary : A Ukrainian drone attack on Moscow killed one Indian worker and injured three others. Ukraine launched its largest drone operation against Russia, with over 1,000 drones reportedly downed. The attack caused damage to residential areas, with casualties reported in Moscow and surrounding regions. Ukraine claims this is a response to Russian attacks.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन