शाम धुमाळ, कसारा: कसारा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर ४ जवळील सायडींग यार्ड जवळ कुत्रीची पिल्लं असतांना त्या ठिकाणी सिमेंटचे स्लीपर आणून टाकल्याने चार ते पाच पिल्लं तेथे अडकली असून त्यातील दोन पिल्ले दगावल्याची विचित्र घटना घडली. कसारा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅक टाकण्यासाठी ठेकेदार कंपनीने स्लीपर मागवले. परंतु सदर स्लीपर रिकामे करताना संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांनी मोकळ्या जागेत असलेल्या कुत्रीच्या पिल्लांकडे लक्ष न देता त्यांच्या जवळ स्लीपर उतरवल्याने मोकळ्या जागेत बसलेली पाच ते सहा पिल्ले या स्लीपर खाली अडकली. तीन ते चार तासापासून पिल्ले आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत होती. परंतु काही केलं त्यांना बाहेर येता आले नाही. त्यांना वाचण्यासाठी कुत्रीचीही धडपड सुरू होती.
कुत्रीची पिल्ले वाचण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य यांनी सुद्धा प्रयत्न केले परंतु यश आले नाही. हे स्लीपर हटवण्याकामी कसारा रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मॅनेजर कार्यालयात प्राणी मित्र व आपत्ती व्यवस्थापन सदस्य असता त्यांना कार्यालयातून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सिमेंट स्लीपर वजनी असल्यामुळे त्यांना हटवण्यासाठी क्रेनची गरज असताना रेल्वे प्रशासनाकडून काहीही सहकार्य दिसले नाही. त्यामुळे दोन पिल्लांचा मृत्यू झाला तर बाकीच्या पिलांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले गेले. उशिरापर्यंत याला यश आले नाही. पिल्लांची आईदेखील आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी धडपड करीत होती. मात्र सर्वच निशब्द झाले.
दरम्यान निष्ठूरपणे वागणाऱ्या ठेकेदार व स्लीपर खाली करणाऱ्या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत असून पिल्लांबाबत माहिती देण्यासाठी गेलेल्या लोकांसोबत संवेदनशील व उद्धट वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
Web Summary : Railway contractor's carelessness trapped puppies under sleepers in Kasara. Two puppies died. Rescue attempts failed due to lack of railway cooperation. Locals demand action.
Web Summary : कसारा में रेलवे ठेकेदार की लापरवाही से स्लीपर के नीचे पिल्ले फंसे। दो की मौत। रेलवे के असहयोग से बचाव प्रयास विफल। कार्रवाई की मांग।