शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 18:28 IST

1 / 6
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये टाटा मोटर्सच्या (Tata Motors) वाहनांची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. गेल्या वर्षात विक्रमी विक्री केल्यानंतर, आता कंपनी 2026-27 या नव्या आर्थिक वर्षातही बाजारात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. टाटा मोटर्स येत्या काही महिन्यांत १-२ नव्हे, तर तब्बल ६ नवीन मॉडेल्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. यात दमदार इलेक्ट्रिक कार्ससह फ्लेक्स-फ्यूल कारचाही समावेश असेल.
2 / 6
टाटा सिएरा ईव्ही - टाटा सिएरा ईव्ही ही प्रीमियम इलेक्ट्रिक कार याच तिमाहीत भारतीय बाजारात येऊ शकते. या कारला ५५ kWh आणि ६५ kWh चे दोन बॅटरी पर्याय असती. मोठ्या बॅटरी पॅकसह ही कार ५०० किमीपेक्षाही अधिक रेंज देतील. यात ३-स्क्रीन डॅशबोर्ड आणि लेव्हल-२ ADAS सारखे फीचर्स असतील.
3 / 6
टियागो-टिगोर फेसलिफ्ट - इएरा ईव्ही शिवाय, कंपनी टियागो आणि टिगोर या बजेट कार्सचे फेसलिफ्ट व्हर्जनही आणण्याच्या तयारीत आहे. यांचा लूक अधिक चांगला असेल. विशेष म्हणजे, कंपनी टियागो ईव्हीमध्ये आता पंच ईव्ही प्रमाणेच मोठा ३० kWh चा बॅटरी पॅक देण्याची शक्यता आहे.
4 / 6
सफारी ईव्ही - हॅरियर ईव्हीनंतर आता टाटा मोटर्स, या वर्षात आपली ७-सीटर 'सफारी ईव्ही' आणण्याची शक्यता आहे. सफारी महिंद्राच्या XEV 9S ला टक्कर देईल.
5 / 6
अविन्या ईव्ही - याशिवाय, टाटाच्या प्रीमियम सब-ब्रांड 'अविन्या'ची पहिली लक्झरी स्पोर्टबॅक कार २०२७ च्या सुरुवातीला बाजारात येईल. ही कार जेएलआर (JLR) च्या प्रगत प्लॅटफॉर्मवर आधारित असेल.
6 / 6
टाटा पंच फ्लेक्स-फ्यूल - पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिकनंतर आता टाटा पंच 'फ्लेक्स-फ्यूल' मध्येही सादर होईल. ही कार इथेनॉल मिश्रित इंधनावर चालेल, यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल आणि ग्राहकांच्या इंधनाचा खर्चही कमी होईल. कंपनी या वर्षाच्या अखेरपर्यंत अथवा 2027 च्या सुरुवातीला आपली पहली फ्लेक्स-फ्यूल कार बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.
टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरcarकार