LeT Terrorist Hair Transplant: जम्मू-काश्मीरमध्ये घातपात घडवण्यासाठी आणि दहशतवादी तळ उभारण्यासाठी पाकिस्तानातून आलेल्या लष्कर-ए-तोयबाचा एका दहशतवाद्याची अजब गोष्ट समोर आली आहे. मोहम्मद उस्मान जट याला भारतात घुसखोरी करताना खोऱ्यात मोठे दहशतवादी हल्ले करण्याचे आणि काश्मीरबाहेर स्लीपर सेलचे जाळे पसरण्याचे आदेश दिले होते. गेल्या महिन्यात श्रीनगर पोलिसांनी त्याला त्याचा साथीदार अब्दुल्ला उर्फ अबू हुरैरा याच्यासह अटक केली होती. पण अटक झाल्यानंतर एनआयए आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी जेव्हा त्याची कसून चौकशी सुरू केली, तेव्हा त्याने केलेले खुलासे ऐकून तपास अधिकारीही चक्रावून गेले.
टक्कल पडल्याने खचला होता आत्मविश्वास
उस्मान जट याने चौकशीदरम्यान सांगितले की, तो गेल्या अनेक वर्षांपासून केस गळती आणि टक्कल पडण्याच्या समस्येने वैतागला होता. यामुळे त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे खचला होता. हेअर ट्रान्सप्लांटसारख्या उपचारपद्धती फक्त पाश्चात्त्य देशांमध्येच उपलब्ध असतात आणि त्या अत्यंत महागड्या असतात, असा त्याचा समज होता.
काश्मीरमध्ये आल्यावर त्याचा संपर्क झरगम आणि अबू हुरैरा या पाकिस्तानी दहशतवाद्यांशी आणि त्यांच्या स्थानिक साथीदारांशी आला. त्यांच्यापैकी एका दुकानदाराने स्वतः हेअर ट्रान्सप्लांट केलेलं उस्मानने पाहिलं. त्यानंतर उस्मानच्या मनातही डोक्यावर केस आणण्याची इच्छा जागी झाली.
श्रीनगरच्या क्लिनिकमध्ये उपचार आणि गुपचूप मुक्काम
त्या दुकानदाराच्या मदतीने उस्मानने श्रीनगरमधील एका नामांकित क्लिनिकमध्ये डॉक्टरांची भेट घेतली. धक्कादायक म्हणजे, दहशतवादी कारवायांचे नियोजन करण्याऐवजी तो अनेकदा या क्लिनिकमध्ये फेऱ्या मारत होता. उपचारादरम्यान त्याला काही रात्री या क्लिनिकमध्येच घालवाव्या लागल्या होत्या. केस प्रत्यारोपणाची ही प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर तो श्रीनगरमधून सार्वजनिक वाहनाने जम्मू आणि तिथून बसने थेट पंजाबमधील मालेरकोटला येथे पळून गेला. तेथे तो तुर्की मालिका पाहत आणि इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करत वेळ घालवत होता.
खोटेपणा आला समोर
उस्मानने तपासात कबूल केले की, पाकिस्तानातील दहशतवादी कॅम्पमध्ये काश्मीरबद्दल जे काही शिकवले गेले होते, त्यापेक्षा प्रत्यक्षात काश्मीरमधील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आणि सामान्य होती. त्याला मुख्य प्रवाहात सामील होऊन भारतातच सामान्य नागरिक म्हणून जगायचे होते. त्यासाठी तो पॅन कार्ड, पासपोर्ट यांसारखी बनावट भारतीय ओळखपत्रे बनवण्याच्या तयारीत होता. २०१२ मध्ये भारतात घुसून पुढे बनावट कागदपत्रांच्या आधारे इंडोनेशिया आणि आखाती देशात पळालेल्या उमर उर्फ खरगोश या दहशतवाद्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा उस्मानचा प्लॅन होता.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जट्टच्या चौकशीतून श्रीनगर आणि उत्तर काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या लष्करच्या नेटवर्कबाबत महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे, अनेक संशयित आणि लपण्याच्या ठिकाणांविषयीची माहिती समोर आली आहे.
Web Summary : LeT terrorist Usman Jatt, tasked with attacks in Kashmir, prioritized hair transplant. He frequented a Srinagar clinic, even staying overnight. He planned to obtain fake documents and live as a normal Indian citizen, influenced by a shopkeeper who had undergone hair transplantation.
Web Summary : कश्मीर में हमलों का काम सौंपा गया LeT आतंकी उस्मान जट्ट ने हेयर ट्रांसप्लांट को प्राथमिकता दी। वह श्रीनगर के एक क्लिनिक में अक्सर जाता था, यहां तक कि रात भी रुकता था। उसने नकली दस्तावेज प्राप्त कर एक सामान्य भारतीय नागरिक के रूप में रहने की योजना बनाई, जो हेयर ट्रांसप्लांट करा चुके एक दुकानदार से प्रभावित था।