रस्त्यावर रोज लाखो वाहने धावत असतात. यामुळे छोटे-मोठे अपघात होतच असतात. मात्र, चालत्या रस्त्यावर किंवा वाहतूक कोंडीत (जाममध्ये) अचानक मागून गाडी येऊन धडकली तर? खरे तर असा अपघात अतिशय सामान्य आहे. जेव्हा एखादे वाहन मागून येऊन धडकते, तेव्हा अनेकदा लोक मागच्या वाहन चालकाचीच चूक गृहीत धरतात. मात्र, नेहमी असे असेलल असे नाही.
खरे तर, एखादे वाहन मागून येऊन धडकणे, हा जगातील सर्वात सामान्य रस्ते अपघात आहे, याला 'रिअर-एंड कोलिजन' (Rear-End Collision) म्हटले जाते. जागतिक आकडेवारीचा विचार करता, सुमारे ३० टक्के अपघात असेच होतात. ट्रॅफिक नियमांनुसार प्रत्येक चालकाने पुढच्या वाहनापासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक असते. सामान्यपणे मागच्या वाहनालाच जबाबदार धरले जाते. मात्र, प्रत्येक वेळी असेच नसते. जर पुढच्या कारने अचानक ब्रेक दाबला, तिची ब्रेक लाईट खराब असेल, चालकाने संकेत न देता लेन बदलली अथव वाहन रस्त्यावर अचानक उभे केले, तर पुढचा चालकही अपघाताला जबाबदार असतो. याशिवाय, जर मागचा चालक वेगात असेल, गाडी फारच क्लोज चालवत असेल अथवा त्याचे लक्ष नसेल, तर त्याची स्पष्ट आहे. यामुळे संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस रिपोर्ट, साक्षीदार आणि परिस्थितीच्या आधारे केला जातो.
नुकसान भरपाई कोण देणार? काय सांगतो ट्रॅफिक नियम? -
अपघाताची भरपाई कोण करणार, हे कुणाची चूक अधिक? यावर अवलंबून असते. जर मागच्या चालकाने निष्काळजीपणा केला असेल, तर तो नुकसान भरपाई भरेल. याउलट, पुढच्या चालकाच्या चुकीमुळे अपघात झाला असेल, तर त्याला भरपाई द्यावी लागू शकते. अनेकदा दोन्ही चालकांची समसमान चूकही आढळून येते.
अपघात टाळण्यासाठी काही महत्वाचे ट्रॅफिक नियम आहेत. त्यांचे पालन करणे आवश्यक आहे...
- नेहमी पुढच्या वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवायला हवे.
- ठरवून दिलेल्या वेगातच वाहन चालवावे, संकेत न देता लेन बदलू नये.
- वाहनाचे ब्रेक लाईट आणि इंडिकेटर व्यवस्थित असायला हवे.
- सीट बेल्ट व हेल्मेटचा वापर करायला हवा.
- ड्रायव्हिंग करताना मोबाईलचा वापरू करू नये.
- वैध कार इन्शुरन्स पॉलिसी जवळ बाळगावी.
Web Summary : Rear-end collisions are common. Fault depends on circumstances: sudden braking, faulty lights, or following too closely. Police investigate, considering negligence. Maintain safe distance, check lights, avoid distractions to prevent accidents.
Web Summary : पीछे से टक्करें आम हैं। गलती परिस्थितियों पर निर्भर करती है: अचानक ब्रेक, खराब लाइट, या बहुत करीब से पीछा करना। पुलिस लापरवाही पर विचार करते हुए जांच करती है। सुरक्षित दूरी बनाए रखें, लाइटें जांचें, दुर्घटनाओं से बचने के लिए ध्यान भटकाने से बचें।