Join us
Daily Top 2Weekly Top 5

CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."

रवी शास्त्री यांनी लगेच त्याला MS धोनी आज तरी खेळणार का? असा प्रश्न विचारल्यावर ऋतुराजनं असं दिलं उत्तर

By सुशांत जाधव | Updated: May 18, 2026 19:37 IST

Open in App

CSK vs SRH, Ruturaj Gaikwad On MS Dhoni : चेन्नईतील चेपॉकच्या मैदानात यजमान चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात यंदाच्या हंगामातील ६३ वा सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रवी शास्त्री यांनी लगेच त्याला MS धोनी आज तरी खेळणार का? असा प्रश्न विचारला. यावर ऋतुराज म्हणाला की, "तो आमच्यासोबत आहे. पण हा सामना खेळण्यासाठी तो अजूनही फिट नाही.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

मॅचआधी कमांडो म्हणाले, धोनी एकदम फिट;  पण...

चेन्नई सुपर किंग्ससाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्याआधी धोनीने चेन्नईतील नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या कॅम्पला भेट देत कमांडोंसोबत खास संवाद साधला होता. यावेळी त्याने "मी फिट वाटतो ना? असा मजेशीर प्रश्न कमांडोंना विचारला. यावर त्याला हो सर... असं उत्तरही मिळालं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना ऋतुराज गायकवाडनं सरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यासाठी तो अजूनही फिट नसल्याचे स्पष्ट केले.   

 IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)

MS धोनीसंदर्भात ज्या चर्चा रंगल्या त्या फोल ठरल्या



चेन्नई सुपर किंग्सचा संघ यंदाच्या हंगामात घरच्या मैदानातील हा शेवटचा सामना आहे. MS धोनी या सामन्यात मैदानात उतरेल आणि कदाचित IPL कारकिर्दीतील आपला शेवटचा सामना खेळताना दिसेल, अशी चर्चा रंगली होती. पण या सामन्यात दोन्हीं चर्चा फोल ठरल्या आहेत. दुखापतीमुळे धोनी यंदाच्या हंगामात एकही सामना खेळलेला नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की, दुखापतीनंतर तो संघासोबतही दिसला नव्हता. पण यावेळी तो संघासोबत दिसला. 

अश्विनची भविष्यवाणी खरी ठरणार?

संजू सॅमसन याने MS धोनीचा वारसा जपण्याची क्षमता सिद्ध केल्यावर यंदाचा हंगामात MS धोनीसाठी शेवटचा ठरेल, असे चित्र निर्माण झाले आहे.  धोनीनं काही दिवसांपूर्वी शेवटचा सामना चेन्नईत खेळेन, असे बोलून दाखवले होते. त्यामुळेच सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात धोनी IPL कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल, अशी चर्चा रंगली. पण शेवटी  आर अश्विनची भविष्यवाणी खरी ठरताना दिसत आहे. सध्याच्या घडीला चेन्नई सुपर किंग्सचा संघात MS धोनीसाठी जागा करणं मुश्किल आहे, असे मत  आर. अश्विन याने व्यक्त केले होते. जर चेन्नई सुपर किंग्सचा संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर झाला तरच कदाचित MS धोनीला फेअरवेल मॅच मिळेल, असे  मोठं वक्तव्य त्याने केले होते.  

English
हिंदी सारांश
Web Title : CSK vs SRH: Dhoni not fit, Ruturaj reveals at Chepauk.

Web Summary : Ruturaj Gaikwad won the toss and chose to bat first. When asked if Dhoni would play, Ruturaj said he is with the team but still not fit for the match, despite looking fit during a visit with National Security Guard commandos.
टॅग्स :आयपीएल २०२६चेन्नई सुपर किंग्ससनरायझर्स हैदराबादऋतुराज गायकवाडमहेंद्रसिंग धोनी