Waris Pathan on Yogi Adityanath Namaz on Road Controversy: भरउन्हात रस्त्यावर नमाजपठण करण्याची कुणालाही हौस नसते. मशिदीत जागा नसते, त्यामुळे नाईलाजाने रस्त्यावर नमाजपठण करावे लागते. मुस्लिम बांधवांनी ५-१० मिनिटांसाठी रस्त्यावर नमाज पठण केले तर तुमच्या पोटात का दुखतं? आमचे हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, विमानतळावर गरबा खेळतात, पण आम्ही त्यांना काही बोलतो का? प्रत्येकाला आपापल्या धर्मानुसार वागण्याचा अधिकार आहे. आपण धर्मनिरपेक्ष देशात राहतो, अशा शब्दांत एमआयएमचे नेता वारिस पठाण यांनी योगी आदित्यनाथ यांना प्रत्युत्तर दिले. रस्त्यावर नमाजपठण करण्याच्या मुद्द्यावरून योगींनी वक्तव्य केले होते. त्यावर वारिस पठाण व्यक्त झाले.
कावड यात्रेतही रस्त्यांवर ट्रॅफिक जाम होतो...
"कावड यात्रेच्या वेळी कित्येक दिवसांसाठी रस्ते जाम होतात. त्यावेळी त्यांच्यावर कुणीही आक्षेप घेत नाही. त्यांच्यावर फुलं उधळली जातात. हे सगळं करू नका असं आम्ही तेव्हा कधीच म्हणत नाही. पण मुस्लिम धर्माबाबत जेव्हा गोष्टी असतात तेव्हा तुम्ही धमक्या देता. मोदीजी म्हणत होते की सबका साथ, सबका विकास. पण त्यांचेच मुख्यमंत्री रोज प्रक्षोभक विधाने करत आहेत," अशी टीका त्यांनी केली.
देश संविधानानुसारच चालेल
"जर मुस्लिम बांधव रस्त्यावर नमाज पठण करताना दिसले तर तुम्ही काय कराल? त्यांना गोळ्या घालणार का? त्यांना फासावर लटकवणार का? देश संविधानानुसारच चालेल, कायद्यानुसार आणि लॉ ऑफ लँडनुसार चालेल. योगी आदित्यनाथ यांची दादागिरी आणि धमक्यांच्यानुसार देश चालणार नाही. योगी अयशस्वी झाले आहेत. योगींनी मुख्यमंत्री म्हणून संविधानानुसार देश चालवण्याची शपथ घेतली आहे. आता तेच अशाप्रकारच्या भाषेचा वापर करत आहेत. एखाद्या मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारची भाषा वापरणे शोभते का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये हिंदुत्वाचा चॅम्पियन स्पर्धा लागलीय!
"देशात जेवढे भाजपचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यात 'कोण सर्वात मोठा हिंदुत्वाचा चॅम्पियन' अशी स्पर्धाच लागली आहे. काहीही झालं की मुस्लिम बांधवांना शिव्या देत आहेत. याने देशाचे धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन नष्ट होत चालला आहे. नीट पेपरफुटी वरून लक्ष हटवण्यासाठी ही विधाने सुरू आहेत. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरावरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे," असे वारिस पठाण म्हणाले.
Web Summary : Waris Pathan defends road Namaz, questioning objections when Hindus also conduct public worship. He criticizes Yogi Adityanath's remarks and accuses BJP CMs of competitive Hindutva, diverting attention from real issues.
Web Summary : वारिस पठान ने सड़क पर नमाज़ का बचाव किया, हिंदुओं द्वारा सार्वजनिक पूजा करने पर आपत्तियां उठाने पर सवाल उठाया। उन्होंने योगी आदित्यनाथ की टिप्पणियों की आलोचना की और भाजपा के मुख्यमंत्रियों पर असली मुद्दों से ध्यान हटाने के लिए हिंदुत्व की प्रतिस्पर्धा का आरोप लगाया।