SRH Qualified For Playoffs Along With GT What About CSK : ईशान किशनच्या शानदार खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने चेपॉकच्या घरच्या मैदानात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचा धक्का दिला. या विजयासह SRH च्या संघाने प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारलीच. पण या निकालासह गुजरात टायटन्सच्या रुपात प्लेऑफ्सचा तिसरा संघही मिळाला आहे. आता उर्वरित एका जागेसाठी तीन संघात स्पर्धा उरली आहे. यात चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्ससाठीची लढाई ही 'जर तर'ची असून PBKS साठी आता स्वबळावर प्लेऑफ्स गाठण्याची संधी निर्माण झाली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अर्धशतकाशिवाय संपला CSK चा डाव
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने चेपॉकच्या मैदानात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याचा हा निर्णय चांगलाच फसला. संजू सॅमसन १३ चेंडूत २७ धावा करून परतल्यावर उर्विल पटेल याने ८ चेंडूत १३ धावा करत तंबूचा रस्ता धरला. कार्तिक शर्मानंही चांगली सुरुवात मिळाल्यावर १९ चेंडूत ३२ धावा करून मैदान सोडले. धावांसाठी संघर्ष करणारा ऋतुराज गायकवाडच्या रुपात चेन्नईच्या संघाने चौथी विकेट गमावली. त्याने २१ चेंडूचा सामना करून फक्त १५ धावांची भर घातली. अखेरच्या षटकात डेवॉल्ड ब्रेविस याने २७ चेंडूत केलेल्या ४४ धावा आणि शिवम दुबेच्या २३ चेंडूतील २६ धावांसह प्रशांत वीर ११ (९) आणि अकिल हुसेन ३ (१)* यांनी निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर १८० धावा लावल्या.
CSK vs SRH : संजूनं विकेटमागे दाखवली MS धोनीसारखी चपळाई; मग क्लासेनसोबत झाली तू-तू मै-मै! (VIDEO)
ईशानचा शानदार शो! क्लासेनचाही दिसला क्लास अन् SRH नं मारली बाजी
चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना ट्रॅविस हेडनं ६ चेंडूत ६ धावांवर आपली विकेट गमावली. अभिषेक शर्मा २१ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार मारून २६ धावांवर बाद झाला. संघ अडचणीत असताना ईशान किशन आणि क्लासेन जोडी जमली. क्लासेन २६ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४७ धावा करून परतल्यावर ईशान किशनने ४७ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७० धावा करत सामना सनरायझर्स हैदराबादच्या बाजूनं वळवला. अखेरच्या षटकात सलील अरोरा १० (५) आणि स्मरण रविचंद्रन ५ (५) या जोडीनं सनरायझर्स हैदराबादचा विजय निश्चित केला.
Web Summary : SRH's win against CSK propelled them and GT into the playoffs. CSK, DC face a 'if-but' situation. PBKS now has a chance to qualify on its own merit. CSK scored 180/7, with Brevis (44) and Dube (26) contributing after a shaky start.
Web Summary : SRH की CSK पर जीत से वे और GT प्लेऑफ में पहुंचे। CSK, DC के लिए 'अगर-मगर' की स्थिति है। PBKS के पास अब अपने दम पर क्वालीफाई करने का मौका है। CSK ने 180/7 रन बनाए, ब्रेविस (44) और दुबे (26) का योगदान रहा।