"मैं तो शपथ लेने वाला हूँ, रुकने वाला नहीं..." अचानक गुगली टाकून खळखळून हसवणारे 'दादा' सगळ्यांनाच रडवून गेले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 11:45 IST2026-01-28T11:44:52+5:302026-01-28T11:45:47+5:30

Ajit Pawar Memorable Speech: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचं आणि कणखर नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या एका भीषण विमान अपघातात निधन झालं.

maharashtra dcm ajit pawar passes away aircraft accident dadas political tails you will never forget | "मैं तो शपथ लेने वाला हूँ, रुकने वाला नहीं..." अचानक गुगली टाकून खळखळून हसवणारे 'दादा' सगळ्यांनाच रडवून गेले!

"मैं तो शपथ लेने वाला हूँ, रुकने वाला नहीं..." अचानक गुगली टाकून खळखळून हसवणारे 'दादा' सगळ्यांनाच रडवून गेले!

Ajit Pawar Memorable Speech: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचं आणि कणखर नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या एका भीषण विमान अपघातात निधन झालं. 'VSR' कंपनीचं खासगी विमान लँडिंग करत असताना तांत्रिक बिघाडामुळे हवेतच गोल फिरलं आणि जमिनीवर आदळताच त्याचे तुकडे उडाले. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व ५ जणांचा अंत झाला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्ष आणि परिस्थितीशी दोन हात करत ज्या नेत्यानं आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली, ते नाव म्हणजे अजित अनंतराव पवार. राज्याच्या राजकारणात आज त्यांना 'दादा' या नावानं ओळखलं जातं. मात्र, या शिखरापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. एक उत्तम राजकारणी, उत्तम व्यक्तीमत्त्व असण्यासोबतच दादा तितकेच मनमोकळेपणानं व्यक्त होणारेदेखील होते. अचानक गुगली टाकून खळखळून हसवणारे 'दादा' आज सगळ्यांनाच रडवून गेले. त्यांचे राजकारणातील काही किस्से कायमच स्मरणात राहणार आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार कसे बनले 'दादा'; शरद पवारांकडून घेतलेत राजकारणाचे धडे

... आणि ते म्हणाले मी तर शपथ घेणारच

विधानसभेच्या निवडणुकांनंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू होत्या त्यावेळी एकनाथ शिंदे यांना तुम्हीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी सांगताना, देवेंद्र फडणवीसांनी यावर भाष्य केलंय असं म्हटलं. पण यावर तिकडेच असलेल्या अजित पवार यांनी गुगली टाकली. संध्याकाळपर्यंत त्यांचा समन्वय येईल, पर मैं तो रुकनेवाला नहीं, मी तर शपथ घेणारच आहे, असं मिश्किल वक्तव्य त्यांनी केलं. यानंतर दादांना सकाळी आणि संध्याकाळीही शपथ घेण्याचा अनुभव असल्याची टिपण्णी त्यांनी केली. त्यानंतर सर्वांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला.

"बायकोने जेवढे किस घेतले नाहीत तेवढे..."

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच आपल्या बारामती मतदारसंघात गेले होते. त्यावेळी बारामतीकरांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत केलं होतं. त्यावेळी अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत तुफान फटकेबाजी केली होती. “तुम्ही सगळे प्रतिसाद देत होता. एवढी ढकला-ढकली, रेटारेटी, आयु्ष्यात मला कुणी केली नाही. हातात हात द्यायचो, हात ओढायचे, असं वाटायचं हात तुटतील की काय. काही जण हातात हात घेताना मुके पण घ्यायचे, किस घ्यायचे. म्हटलं, बायकोने एवढ्या किस घेतल्या नाहीत. म्हटलं, आज काय चाललंय काय! पण ठरवलं होतं, आज चिडायचं नाही. गप्प बसायचं. सर्वांना हात जोडायचा”, असं म्हणत त्यांनी तुफान फटकेबाजी केली होती.

"पायताण घे अन् हाण माझ्या डोक्यात"

बारामतीतल्या एका कार्यक्रमादरम्यान काही कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारी आणि त्यावर अजित पवारांनी दिलेल्या उत्तरानंतर एकच हशा पिकला होता. ‘मी या ठिकाणी काय नावं घ्यायला आलोय का? मी बायकोचं कधी नाव घेतलं नाही आणि आता कोणाकोणाची नावं घ्यायला लावता?’, असं म्हणत अजित पवार यांनी फटकेबाजी केली होती.

अजित पवार बोलत असताना एका कार्यकर्त्यानं ग्रामपंचायत कामांच्या संदर्भात अडवणूक होत असल्याची तक्रार केली. यावेळी अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. “ग्रामपंचायती वाल्यांना कोणी निवडून दिलं? अजित पवारांनी निवडून दिलं का? मला तुम्ही निवडून दिलं, पण ग्रामपंचायतीमध्ये निवडून देण्यासाठी मी आलो का? तुम्ही ग्रामपंचायतीच्या सदस्यांना निवडून दिलं, तुम्हाला तो अधिकार आहे. तुमचं योग्य काम करतात त्यांची बटनं दाबा. आता पायताण घे आणि माझ्या डोक्यात हाण”, असं म्हणत त्यांनी तुफान फटकेबाजी केली होती.

Web Title : अजित पवार का आकस्मिक निधन: एक राजनीतिक युग का दुखद अंत।

Web Summary : बारामती के पास विमान दुर्घटना में अजित पवार के दुखद निधन से महाराष्ट्र में शोक है। 'दादा' के नाम से जाने जाने वाले, उनकी राजनीतिक यात्रा और मजाकिया टिप्पणियों ने उन्हें कई लोगों का प्रिय बना दिया। महाराष्ट्र की राजनीति में उनके यादगार उद्धरणों और योगदानों को याद किया जाएगा।

Web Title : Ajit Pawar's sudden demise: A political era ends in tragedy.

Web Summary : Maharashtra mourns Ajit Pawar's tragic death in a plane crash near Baramati. Known as 'Dada,' his political journey and witty remarks endeared him to many. His memorable quotes and contributions to Maharashtra's politics will be remembered.