शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 15:56 IST

कानपूरच्या चकेरी येथे श्याम नगर येथे राहणारी मोनाली सिंह हिचे डिसेंबर २०२२ मध्ये लखनौ येथील आकर्ष खरेसोबत लग्न झाले होते

लखनौ - संघर्षातून स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्या अनेक प्रेरणादायी कहाणी आपण ऐकत असतो. त्यात अशीच एक कहाणी विवाहित जोडप्याची आहे. ज्यांनी अलीकडेच सरकारी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवून थेट अधिकारी बनले आहेत. उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाचे निकाल समोर आलेत. त्यात मोनाली सिंह आणि आकर्ष खरे या जोडप्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मोनाली सिंह तहसीलमध्ये लेखापाल पदावर तैनात होती. तिने लग्नानंतर तिच्या शिक्षणाला नवी दिशा दिली.

मोनालीला मेहनत करताना पाहून पती आकर्ष खरे यानेही पीसीएस परीक्षा देण्याची तयारी सुरू केली. विना कोचिंग संस्था, केवळ ऑफिसमधून घरी आल्यावर शिल्लक असलेला वेळ आणि सेल्फ स्टडीच्या जोरावर या जोडप्याने असं यश पटकावले आहे. जे लाखो युवकांचे स्वप्न असते. मोनाली आता लेखपालहून थेट असिस्टेंट कमिश्नर बनली आहे तर तिचा पती आकर्षची वाणिज्यिक कर अधिकारी पदावर नियुक्त झाली आहे. 

कानपूरच्या चकेरी येथे श्याम नगर येथे राहणारी मोनाली सिंह हिचे डिसेंबर २०२२ मध्ये लखनौ येथील आकर्ष खरेसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या वेळी मोनाली लेखापाल पदावर होती आणि आकर्ष खरे हायकोर्टात अधिकारी होता. साधारणत: लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात आणि शिक्षण मागे पडते. परंतु मोनाली सिंहने याला आपली ताकद बनवले. मोनालीची जिद्द पाहून आकर्षनेही तिला साथ द्यायचे ठरवले आणि दोघेही एकमेकांचे स्टडी पार्टनर बनले. मोनाली नरवाल तहसिलमध्ये लेखापाल म्हणून काम करत होती. काम करत अभ्यास करणे आव्हानात्मक होते. याच वेळी आकर्ष खरे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये आपलं काम सांभाळत होता. दिवसभराच्या थकव्यानंतरही ते दोघे रात्री फोनवर किंवा सुट्ट्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा करत असत. माझी नोकरी किंवा लग्न हे कधीच अडथळे नव्हते उलट माझे कुटुंब आणि सासरच्या मंडळींनी नेहमीच पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली असं मोनालीने सांगितले. 

महसूल विभागात लेखापालपदापासून आता असिस्टेंट कमिश्नरपदापर्यंत मोनालीचा प्रवास जीवापाड मेहनतीचा परिणाम आहे. मोनाली सिंह असिस्टेंट कमिश्नर होताच तिच्यासोबत काम करणाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. मुलीच्या या यशाने आई वडिलांच्या डोळ्यातही आनंदाश्रू आले. योगायोगाने पती-पत्नी दोघांचीही वाणिज्य कर विभागात निवड झाली आहे. मोनाली सहायक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारतील तर आकर्ष खरे वाणिज्य कर अधिकारी म्हणून आपल्या नवीन कारकिर्दीला सुरुवात करतील. करिअर आणि कुटुंबात संतुलन साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या लाखो विवाहित जोडप्यांसाठी हे जोडपे आता एक प्रेरणादायी बनले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Married couple achieves dream: Both become government officers together!

Web Summary : Monali and Akarsh, a married couple, cracked Uttar Pradesh civil services exam. Monali, a clerk, became Assistant Commissioner. Her husband, Akarsh, became a Commercial Tax Officer. They balanced work, family, and studies, inspiring many.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी