शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 17:36 IST

अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध, महाराष्ट्रातील राजकारण, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आणि आयपीएलचा 'रनसंग्राम' यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स.. ...

03 Apr, 26 08:28 PM

कल्याणमध्ये स्टंटबाजांचा हैदोस; जागरूक नागरिकांचे पालक आणि पोलिसांना आवाहन

कल्याणमधील गांधारी रिंग रोड हा स्टंटबाजांचा अड्डा बनल्याचे समोर आले आहे. एका निष्पाप व्यावसायिकाच्या मृत्यूनंतरही स्टंटबाजी थांबलेली नसून पुन्हा एकदा स्टंटबाजीचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे संतप्त नागरिकांनी पालक आणि पोलिस प्रशासनाला कठोर कारवाईचे आवाहन केले आहे.

03 Apr, 26 06:56 PM

बीड : छाया पांचाळ मृत्यू प्रकरणाला एक वर्ष; चौकशी अहवालात डॉक्टरांसह स्टाफवर ताशेरे

बीड तालुक्यातील आंबील वडगाव येथील छाया पांचाळ यांचा बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. या घटनेला काल एक वर्ष पूर्ण झाले असून, चौकशी अहवालात डॉक्टर आणि रुग्णालयातील स्टाफवर गंभीर आरोप दिसून आले आहेत.

03 Apr, 26 06:15 PM

राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले

आम आदमी पार्टी आणि पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. राज्यसभेतील 'आप'च्या उपनेतेपदावरून हटवण्यात आल्यानंतर, राघव चड्ढा यांनी एक व्हिडीओ जारी करून स्वतःच्याच पक्षावर निशाणा साधला. याला प्रत्युत्तर म्हणून 'आप' नेत्यांनीही आपल्याच खासदारावर हल्लाबोल केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राघव चड्ढा हे 'कॉम्प्रोमाइज्ड' झाले असल्याचं म्हटलं आहे. वाचा सविस्तर

03 Apr, 26 06:05 PM

रशिया भारताला LNG पुरवठा वाढवण्याची शक्यता

पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताला होणारा तेल आणि एलएनजी पुरवठा टप्प्याटप्प्याने वाढवला जाऊ शकतो, असे रशियाने म्हटले आहे. रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मंतुरोव्ह यांनी सांगितले की, भारतीय बाजारपेठेत तेल आणि एलएनजी पुरवठा वाढवण्यासाठी रशियन कंपन्यांकडे पुरेशी क्षमता आहे. जागतिक ऊर्जा संकटाच्या काळात भारताच्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी रशिया महत्त्वाची भूमिका बजावू शकते असे आश्वासनही त्यांनी दिले.

03 Apr, 26 05:40 PM

मुंबईत ऐन उन्हाळ्यात ढगाळ वातावरण का? हवामान विभाग अधिकारी काय म्हणाले? पाहा...

03 Apr, 26 05:36 PM

अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड

तेलंगणाच्या वारंगल जिल्ह्यातील सब-रजिस्ट्रार कार्यालयात भ्रष्टाचाराचं एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. तेलंगणा अँटी-करप्शन ब्युरोने (ACB) २ एप्रिल रोजी वारंगल (ग्रामीण) सब-रजिस्ट्रार कार्यालयावर अचानक छापा टाकला. वारंगल रेंजच्या एसीबी अधिकाऱ्यांनी हनुमकोंडा जिल्ह्यातील या कार्यालयात ही कारवाई केली. या छाप्यानंतर दोन अधिकाऱ्यांच्या घरांचीही झडती घेण्यात आली, जिथे कोट्यवधी रुपयांचं सोनं-चांदी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. वाचा सविस्तर

03 Apr, 26 05:36 PM

मायदेशी पाठवलेले बांगलादेशी पुन्हा मुंबईत

मायदेशी पाठवलेले बांगलादेशी पुन्हा मुंबईत, पोलिसांची डोकेदुखी वाढली; पाहा सविस्तर आढावा...

03 Apr, 26 05:31 PM

चैत्र पौर्णिमा यात्रेला जेजुरी गडावर भाविकांची गर्दी

चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी उसळली. कुलधर्म-कुलाचारानुसार विविध धार्मिक विधी पार पडत ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या घोषणांनी गड परिसर दुमदुमून गेला.

03 Apr, 26 01:45 PM

बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी

बिहारमध्ये दारूबंदी असली तरी तिथे अजूनही विषारी दारूमुळे लोकांचा मृत्यू होत आहे. मोतिहारी जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर सात जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी अनेक लोकांची दृष्टी गेली आहे. दोन रुग्णांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. वाचा सविस्तर

03 Apr, 26 01:29 PM

सोलापूरचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

03 Apr, 26 01:23 PM

पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! 

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडमुकीच्या रणधुमाळीने राजकीय वातावरण जबरदस्त ढवळून निघत आहे. यातच नुकत्याच समोर आलेल्या 'VoteVibe' च्या ताज्या ओपिनियन पोलने राज्याच्या राजकारणात संमिश्र चित्र निर्माण केले आहे. या सर्वेक्षणात, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा सरकार स्थापन करताना दिसत असला तरी, त्यांना जागांचा मोठा फटका बसत असल्याचेही दिसत आहे. तर भाजप जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. या नव्या सर्वेक्षणानुसार, २९४ सदस्यीय विधानसभेत टीएमसीला १७४ ते १८४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भाजपला यावेळेस १०८ ते ११८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  १४८ हा बहुमताचा आकडा आहे. सविस्तर वाचा

03 Apr, 26 01:21 PM

पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! 

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडमुकीच्या रणधुमाळीने राजकीय वातावरण जबरदस्त ढवळून निघत आहे. यातच नुकत्याच समोर आलेल्या 'VoteVibe' च्या ताज्या ओपिनियन पोलने राज्याच्या राजकारणात संमिश्र चित्र निर्माण केले आहे. या सर्वेक्षणात, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा सरकार स्थापन करताना दिसत असला तरी, त्यांना जागांचा मोठा फटका बसत असल्याचेही दिसत आहे. तर भाजप जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. या नव्या सर्वेक्षणानुसार, २९४ सदस्यीय विधानसभेत टीएमसीला १७४ ते १८४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भाजपला यावेळेस १०८ ते ११८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  १४८ हा बहुमताचा आकडा आहे.

03 Apr, 26 12:32 PM

१९० कोटींचा विमा घोटाळा उघड

 माउंट एव्हरेस्टच्या गाईड्सवर असा गंभीर आरोप आहे की, ते पर्यटकांच्या अन्नात गुपचूप काही पदार्थ मिसळून त्यांना आजारी पाडत होते, जेणेकरून हेलिकॉप्टरने रेस्क्यू करता येईल. हा तब्बल २ कोटी डॉलर्सचा इन्शुरन्स क्लेम' म्हणजेच विमा घोटाळा असल्याचं म्हटलं जात आहे. नेपाळ पोलिसांनी या कटात सामील असलेल्या ३२ जणांवर संघटित गुन्हेगारी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. वाचा सविस्तर

03 Apr, 26 12:27 PM

खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी

भोंदू अशोक खरात पीडिताला तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूची भीती दाखवून लाखो रुपये स्वीकारत असे. एवढेच नव्हे तर त्याने मिरगाव येथील १५ ते २० लाखांची जमीन अशाच प्रकारे कवडीमोल भावात नावावर करून घेतल्याची चर्चा आहे. वाचा सविस्तर

03 Apr, 26 12:19 PM

"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले"; ६० देशांच्या बैठकीत भारतानं मांडली स्पष्ट भूमिका

अमेरिका-इस्रायल यांच्या सोबतच्या युद्धात इराणने 'होर्मुझच्या समुद्रधुनी'चा शस्त्राप्रमाणे वापर करायला सुरुवात केल्याने जवळपास संपूर्ण जगावरच तेलाचे भीषण संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर, इराणने बंद केलेली ‘होर्मुझची समुद्रधुनी’ पुन्हा सुरू करण्यासाठी ब्रिटनच्या पुढाकाराने ६० हून अधिक देशांची एक महत्त्वाची ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रीही सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भारताची भूमिका अत्यंत ठामपणे मांडली.

परराष्ट्र सचिव म्हणाले, "या संकटाचा भारतावर थेट परिणाम झाला आहे. आखाती प्रदेशात व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांमध्ये भारतीय नाविकांचा मृत्यू झाला आहे. या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे, सर्व संबंधित पक्षांमध्ये संवाद आणि कुटनीतिक संबंध पुन्हा सुरू करून तणाव कमी करणे." एवढेच नाही तर, "होर्मुझ नाकेबंदीमुळे जागतिक ऊर्जा सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे," असा इशाराही विक्रम मिस्री यांनी यावेली दिला.

03 Apr, 26 12:09 PM

पाकिस्तानात पेट्रोल 458, डिझेल 520 रुपयांवर, होतेय भारताशी तुलना

सध्या पाकिस्तान अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात मध्यस्थीचा आव आणताना दिसत आहे. मात्र प्रत्यक्षात या युद्धामुळे त्याचेच पुरते कंबरडे मोडले आहे. येथे तेलाचा एवढा तुटवडा निर्माण झाला आहे की, शहबाज शरीफ सरकारने रात्रीतूनच पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १३७, तर डिझेलच्या दरात १८४ रुपयांची प्रचंड वाढ केली आहे. या क्रूर दरवाढीनंतर आता पाकिस्तानात पेट्रोल ४५८ तर डिझेल ५२० रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. वाचा सविस्तर

03 Apr, 26 12:13 PM

आता इंधन आणि खतांचंही टेन्शन संपणार! रशिया धावला भारताच्या मदतीला

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात मध्यपूर्वेत पेटलेल्या युद्धाने संपूर्ण जग इंधन टंचाइचा सामना करताना दिसत आहे. यातच आता, भारताचा जुना मित्र असलेला रशिया मदतीसाठी सरसावला आहे. रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मांतुरोव यांनी गुरुवारी भारताला तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. मांतुरोव यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेऊन ऊर्जा आणि खते यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर सविस्तर चर्चा केली. सविस्तर वाचा

03 Apr, 26 12:12 PM

पोटनिवडणूक २०२६: बारामती, राहुरीत निवडणूक बिनविरोध नाहीच, काँग्रेस उतरणार मैदानात

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली असून, दोन्ही मतदारसंघात बिनविरोध निवडणूक होण्याची चर्चा सुरूवातीला सुरू होती. पण, आता काँग्रेसने दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. 

पोटनिवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीने होकार दिला असून, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही याबद्दल माहिती दिली आहे. 

राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागणारे अर्ज पक्षाकडे आले आहेत. बारामतीतून ६ अर्ज, तर राहुरी मतदारसंघातून चार जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केल्याचे सपकाळ यांनी सांगितले. इच्छुकांच्या मुलाखती झाल्या असून, पुढील दोन दिवसात भूमिका जाहीर करणार असल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे. काँग्रेसने निवडणुकीत उडी घेतल्यास बिनविरोधची शक्यता मावळणार आहे. 

03 Apr, 26 11:59 AM

अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले

इराणमधून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अमेरिकन हवाई दलाचे एफ-३५ हे लढाऊ विमान इराणच्या लष्कराने पाडले आहे. मध्य इराणच्या हवाई हद्दीत असताना ही कारवाई करण्यात आल्याचा दावा इराणने केला आहे. १५ दिवसात अमेरिकेने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान गमावले आहे. दरम्यान, यावर अमेरिकन लष्कराकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

03 Apr, 26 11:59 AM

एकनाथ शिंदेंनी घेतले तिरुपतीचे दर्शन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिरुमला येथे तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदेंही होते.

टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरAshok Kharatअशोक खरातDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईFuel Crisisइंधन टंचाईPrice Hikeदर वाढNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस