Ajit Pawar Passed Away :महाराष्ट्रावर शोककळा...! अजित पवार यांचा यांच्या हातातील घड्याळावरुन पटली मृतदेहाची ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 13:31 IST2026-01-28T13:27:57+5:302026-01-28T13:31:25+5:30

या भीषण अपघातात अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या हातातील घड्याळावरून पटल्याची माहिती समोर

Ajit Pawar Passed Away Maharashtra in mourning Ajit Pawars watch identified the body | Ajit Pawar Passed Away :महाराष्ट्रावर शोककळा...! अजित पवार यांचा यांच्या हातातील घड्याळावरुन पटली मृतदेहाची ओळख

Ajit Pawar Passed Away :महाराष्ट्रावर शोककळा...! अजित पवार यांचा यांच्या हातातील घड्याळावरुन पटली मृतदेहाची ओळख

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज सकाळी एका भीषण विमान अपघातात अकाली निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. बारामती विमानतळाजवळ त्यांच्या खासगी विमानाचा सकाळी सुमारे पावणे नऊच्या सुमारास अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!

अपघात इतका भीषण होता की विमानाला तात्काळ आग लागून संपूर्ण विमान जळून खाक झाले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. अपघाताची माहिती मिळताच प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, बारामती येथील रुग्णालयाबाहेर कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली असून वातावरण भावनिक झाले आहे. आपल्या नेत्याच्या आठवणींनी अनेक कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहायला मिळत आहे.



समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन बारामतीतील विद्याप्रतिष्ठान परिसरात होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ परिसरातही समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे.

अजित पवार हातातील घड्याळावरुन पटली मृतदेहाची ओळख
समोर आलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या हातातील घड्याळावरून पटल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताच्या तीव्रतेमुळे ओळख पटवणे कठीण झाले होते. या घटनेवरून अपघात किती भीषण होता, याची कल्पना येते. 

Web Title : महाराष्ट्र में शोक: अजित पवार की विमान दुर्घटना में मौत की खबर

Web Summary : उपमुख्यमंत्री अजित पवार का बारामती हवाई अड्डे के पास एक विमान दुर्घटना में निधन हो गया। सुबह करीब 8:45 बजे निजी विमान दुर्घटनाग्रस्त हो गया, जिसमें सवार सभी पांच लोगों की मौत हो गई। पवार की कलाई घड़ी से पहचान हुई। समर्थक शोक व्यक्त करने के लिए एकत्रित हुए।

Web Title : Tragedy Strikes Maharashtra: Ajit Pawar Reportedly Dies in Plane Crash

Web Summary : Deputy Chief Minister Ajit Pawar reportedly died in a plane crash near Baramati airport. The private plane crashed around 8:45 AM, killing all five on board. Identification was made via Pawar's wristwatch. Supporters gathered, expressing grief.