"अजित पवारांच्या विमानाला रनवे ११ वर उतरायला परवानगी दिली, MAYDAY कॉल..."; सरकारचं निवेदन जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 16:47 IST2026-01-28T16:37:45+5:302026-01-28T16:47:12+5:30

Ajit Pawar Dead: या अपघाताचा तपास AAIB कडून सुरू आहे. हे विमान VI-SSK ने सकाळी ८.१८ वाजता पहिल्यांदा बारामती एटीसीला संपर्क साधला होता.

"Ajit Pawar plane was allowed to land on baramati runway 11, MAYDAY call..."; Government statement issued on Plane Crash | "अजित पवारांच्या विमानाला रनवे ११ वर उतरायला परवानगी दिली, MAYDAY कॉल..."; सरकारचं निवेदन जारी

"अजित पवारांच्या विमानाला रनवे ११ वर उतरायला परवानगी दिली, MAYDAY कॉल..."; सरकारचं निवेदन जारी

पुणे - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. या दुर्घटनेचा तपास एएआयबीने सुरू केला आहे. या अपघातानंतर आता सरकारकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यात बुधवारी ज्या विमान अपघात अजित पवारांचा मृत्यू झाला. त्या विमानाला रनवे ११ वर उतरण्याची परवानगी मिळाली होती असं सांगण्यात आले आहे.

अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!

सरकारच्या निवदेनात सांगण्यात आलंय की, घटनेवेळी कुठलाही रिडबॅक मिळाला नाही. एक मिनिटांनी एटीसीला आग भडकल्याची दिसली. पायलटने विमान लँडिंगचा प्रयत्न केला होता जो अयशस्वी ठरला. या अयशस्वी लँडिंगनंतर अजित पवारांच्या विमानाला सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी रनवे ११ वर उतरण्याची परवानगी दिली होती. परंतु या क्लीयरेंसनंतर कुठलाही रिडबॅक मिळाला नाही. सकाळी ८ वाजून ४४ मिनिटांनी एटीसीला आग पाहायला मिळाली. त्याशिवाय अपघातापूर्वी एटीसीला MAYDAY कॉल मिळाला नव्हता. कुठल्याही प्रकारे आपत्कालीन सूचना पायलटने दिली नव्हती असं सरकारने स्पष्ट केले.

तर या अपघाताचा तपास AAIB कडून सुरू आहे. हे विमान VI-SSK ने सकाळी ८.१८ वाजता पहिल्यांदा बारामती एटीसीला संपर्क साधला होता. विमानाने बारामतीपासून ३० नॉटिकल मैलावरून पुढचा कॉल केला होता. त्यांना पुणे अ‍ॅप्रोचमधून सोडण्यात आले आणि पायलटच्या विवेकबुद्धीनुसार दृश्यमान हवामान परिस्थितीत उतरण्याचा सल्ला देण्यात आला होता. अपघातग्रस्त विमानाच्या क्रूने हवामान आणि दृश्यमानबाबत विचारले तेव्हा एटीसीने त्यांना माहिती दिली. हवा शांत होती आणि दृश्यता जवळपास ३००० मीटर होती. त्यानंतर विमानाला रनवे ११ वर उतरण्याची सूचना दिली होती परंतु रनवे दिसत नव्हता. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात गो अराऊंड करण्यात आले. गो अराऊंडनंतर विमानाची स्थिती विचारली असता त्यांना रनवे दिसल्यानंतर सूचित करण्यास सांगितले होते.

विमानातील पायलटने एटीसीला रनवे अजूनही दिसत नसल्याचं सांगितले. दिसल्यानंतर कळवतो असं म्हटलं. त्यानंतर काही सेकंदात रनवे दिसला असं पायलटने सांगितले. सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी रनवे ११ वर उतरण्याची परवानगी दिली. परंतु क्रू ने या लँडिंग क्लीयरेंसचा रिडबँक दिला नाही. एटीसीने रनवे ११ च्या थ्रेशहोल्डजवळ आग पाहिली. त्यानंतर आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहचल्या. सुरुवातीच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बारामती विमानतळावर दाट धुके होते आणि दृश्यमानता देखील खूप कमी होती. या विमान अपघातात अजित पवारांसह ४ जणांचा मृत्यू झाला. 

Web Title : अजित पवार के विमान को रनवे की अनुमति; कोई मेडे कॉल नहीं: सरकार

Web Summary : सरकार का कहना है कि अजित पवार के विमान को रनवे 11 पर उतरने की अनुमति दी गई थी। दुर्घटना से पहले कोई मेडे कॉल नहीं मिला। AAIB दुर्घटना की जांच कर रही है। खराब दृश्यता का हवाला दिया गया।

Web Title : Ajit Pawar's Plane Cleared for Runway; No MAYDAY Call: Government

Web Summary : Government states Ajit Pawar's plane was cleared to land on runway 11. No MAYDAY call received before the crash. AAIB investigates accident. Poor visibility cited.