शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 14:42 IST

Who Is Raghav Chadha: आपचे 'पोस्टर बॉय' आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना पक्षाच्या रोषाचा सामना करण्याची वेळ आली आहे.

Who Is Raghav Chadha: गेल्या दोन दिवसांपासून राघव चड्ढा चर्चेत आले आहेत. आम आदमी पक्षाकडून राज्यसभेवर खासदार असलेल्या राघव चड्ढा यांची उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाच्या या निर्णयावर राघव चड्ढा यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर आता आम आदमी पक्षातील नेत्यांकडून जोरदार पलटवार केला जात आहे. आम आदमी पक्षाकडून पंजाबमधून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेलेले आणि सर्वसामान्यांचे प्रश्न राज्यसभेत मांडणारे राघव चड्ढा कोण आहेत, याबाबत जाणून घेऊ...

स्वाती मालीवाल यांच्या बंडखोरीनंतर, आता आम आदमी पक्षाचे (आप) 'पोस्टर बॉय' आणि राज्यसभा खा. राघव चड्ढा यांना पक्षाच्या रोषाचा सामना करण्याची वेळ आली आहे. पक्षाने चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवले असून, त्याजागी पंजाबमधील खासदार अशोक मित्तल यांची नियुक्ती केली आहे. चड्ढा हे यापूर्वी 'आप'चे राष्ट्रीय प्रवक्ते होते आणि त्यांच्याकडे पंजाबच्या पक्षविषयक कारभाराची जबाबदारी होती. गेल्या अनेक महिन्यांपासून चड्ढा यांनी स्वतःला प्रसिद्धीपासून दूर ठेवले आहे. ते राज्यसभेतील चर्चामध्ये सहभागी होत असले तरी ते पक्षाच्या उपक्रमांपासून अलिप्त राहत आहेत.

मोदी सरकारचे कौतुक भोवले

मद्य घोटाळा प्रकरणातील खटला विशेष न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर, 'आप'ने मोठा जल्लोष केला होता; कारण हा अरविंद केजरीवाल यांच्या निर्दोषत्वाची पुष्टी करणारा निकाल होता. मात्र, या जल्लोषाच्या गदारोळात एक आवाज मात्र प्रकर्षाने अनुपस्थित होता, तो म्हणजे राघव चड्ढा यांचा. दुसरे म्हणजे पक्षाच्या दृष्टीने सर्वाधिक संताप आणणारी घटना म्हणजे, ई-कॉमर्स अॅप्सद्वारे केल्या जाणाऱ्या '१० मिनिटांत डिलिव्हरी'च्या सुविधेवर केंद्राने निर्बंध लादले असताना, चढ्ढा यांनी राज्यसभेत मोदी सरकारचे कौतुकपर भाषण केले. त्यांनी अत्यंत सौम्य आणि सकारात्मक शब्दांत कौतुक केले होते.

राघव चड्ढा यांचे शिक्षण किती, राजकीय कारकीर्द कशी?

राघव चड्ढा यांनी राज्यसभेत सर्वसामान्य जनतेच्या दररोजच्या जीवनातील प्रश्न आणि मुद्दे आवर्जून राज्यसभेत मांडले. राघव चड्ढा व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्च शिक्षण घेतले आहे. २०१ मध्ये त्यांची आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली. अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. सन २०२० मध्ये राजेंद्र नगर मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. पंजाब विधानसभा निवडणुकीत 'आप'ला मिळालेल्या ऐतिहासिक विजयात प्रभारी म्हणून राघव यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून एप्रिल २०२२ मध्ये त्यांची पंजाबमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली.

पक्षाने पदावरून हटवल्यानंतर राघव चड्ढा यांची पोस्ट चर्चेत

उपनेते पदावरून हटवल्यानंतर राघव चड्ढा यांनी २ मिनिटे ४ सेकंदांचा एक व्हिडिओ एक्सवर शेअर केला. यामध्ये त्यांनी अलीकडच्या काळात संसदेत सर्वसामान्यांच्या हितासाठी उठवलेल्या आवाजाची झलक दाखवली आहे. मध्यमवर्गीयांवरील कराचा बोजा, मोबाइल रिचार्जमधील २८ दिवसांचा 'स्कॅम', इन्कमिंग कॉल चार्जेस आणि डेटा एक्स्पायरी समस्या, पेपर लीक प्रकरण आणि हवाई प्रदूषणाचा प्रश्न, आरोग्य विम्यावरील GST आणि विमानतळावरील महागडे खाद्यपदार्थ, पॅटर्निटी लीव (पितृत्व रजा) आणि बँकांमधील मिनिमम बॅलन्स दंड, अशा प्रमुख मुद्द्यांचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. 

दरम्यान, उदयपूरमध्ये राघव चड्ढा आणि बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. लंडनमध्ये शिक्षणादरम्यान झालेली त्यांची मैत्री पुढे प्रेमात बदलली. या हाय-प्रोफाईल विवाहामुळे राघव चड्ढा राष्ट्रीय स्तरावर घराघरात पोहोचले. परिणीती चोप्रा अनेकदा संसदेच्या गॅलरीत बसून राघव यांचे भाषण ऐकताना दिसते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतात.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Raghav Chadha: Education, political journey of the Aam Aadmi Party leader

Web Summary : Raghav Chadha, recently removed from Rajya Sabha deputy leader post, is an Aam Aadmi Party MP from Punjab. A chartered accountant with LSE education, he rose as a trusted aide of Kejriwal, becoming an MLA and playing key role in AAP's Punjab victory. His marriage with Parineeti Chopra gained national attention.
टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाAam Admi partyआम आदमी पार्टीAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल