शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-Gokul Dudh Sangh: ‘के. पी- ए. वाय.’ एकत्र येतात तर मग ‘बंटी-महाडिक’ का नाही?; सतेज पाटील यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 18:07 IST

Kolhapur-Gokul Dudh Sangh: ‘गोकुळ’मध्ये महायुतीला शुभेच्छा

कोल्हापूर : ‘बंटीसाहेब तुम्ही आणि महाडिक एकत्र येणार आहे, अशी जिल्ह्यात चर्चा सुरू आहे, त्यातील खरे काय?’ असा चिमटा माजी आमदार के. पी. पाटील यांनी काढल्यानंतर ‘जर तुम्ही व ए. वाय. पाटील एकत्र येत असाल तर मग ‘बंटी व महाडिक’ का नाही? असा पलटवार आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी केल्याने ऐकणाऱ्यांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या.

कोल्हापूर बाजार समितीच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी जिल्हा बँकेत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार सतेज पाटील, माजी आमदार संजय घाटगे, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, राजेश पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर आदींची बैठक झाली. बैठकीनंतर या नेत्यांमध्ये चांगलीच टोलेबाजी रंगली, त्याची चर्चा दिवसभर जिल्हा बँकेत सुरू होती.

गोकुळ’च्या राजकारणाचा संदर्भात देत सतेज पाटील यांच्याकडे पाहत, ‘बरे केले, आमच्यात भांडणे लावून तुम्ही मजा बघत बसलाय’ असे मंत्री मुश्रीफ म्हणाले. ‘माझे काय नाही, तुमचे महायुतीचे जोरात सुरू आहे, माझ्या तुमच्या महायुतीला शुभेच्छा आहेत’, असे सतेज पाटील म्हणताच, आम्ही महायुती म्हणूनच ‘गोकुळ’ची निवडणूक लढणार असल्याचे आमदार विनय कोरे यांनी सांगितले.

राजेश पाटील आमच्यासोबतच राहणार

‘गोकुळ’च्या निवडणुकीत महायुती म्हणूनच लढणार, असे आमदार कोरे यांनी सांगितल्यानंतर, ‘तुम्ही महायुती म्हणून लढा, पण माजी आमदार राजेश पाटील हे माझ्यासोबतच असतील’, असे संकेत आमदार सतेज पाटील यांनी दिले.

‘ए. वाय.’ आणि मी एकत्रच !

के. पी आणि ए. वाय.’ यांना एकत्र यायला चालते मग आम्ही का नाही? असे सतेज पाटील हे म्हटल्यानंतर के. पी. पाटील म्हणाले, ‘ए. वाय. पाटील व माझे कधीच भांडण नाही. आम्ही एकमेकांच्या विरोधात नाही एकत्रच आहोत’, हे ऐकून सगळे जोरात हसले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Political banter over Gokul milk union sparks alliance speculations.

Web Summary : Political banter in Kolhapur sparked speculation about alliances for Gokul milk union. Satej Patil hinted at potential partnerships, questioning why certain leaders couldn't unite if others could, creating amusement and discussion.
टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकAmal Mahadikअमल महाडिकA. Y Patilए. वाय. पाटीलK P. Patilके. पी. पाटील