Join us
Daily Top 2Weekly Top 5

WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?

बांगलादेशनं उडवला पाकचा धुव्वा, त्याचा टीम इंडियाला असा झाला फायदा

By सुशांत जाधव | Updated: May 12, 2026 18:47 IST

Open in App

बांगलादेशच्या संघाने घरच्या मैदानात पाकिस्तान विरुद्ध पहिला कसोटी सामना जिंकत इतिहास रचला आहे. ढाकाच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या द्विपक्षीय कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात यजमान  संघाने पाहुण्या संघाचा १०४ धावांनी धुव्वा उडवला. बांगलादेशच्या या लक्षवेधी कामगिरीचा पाकिस्तानला मोठा फटका बसला असून WTC गुणतालिकेत टीम इंडियाला फायदा झाला आहे. 

बांगलादेशनं उडवला पाकचा धुव्वा, त्याचा टीम इंडियाला असा झाला फायदा

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील निकालानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ चक्रातील    गुणतालिकेत फेरबदल झाला आहे. याआधी पाकिस्तानचा संघ भारतीय संघाच्या पुढे होता. पण तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या पराभवासह त्यांचे गणित बिघडले आहे. कोणताही कसोटी सामना न खेळता टीम इंडिया  एका स्थानाच्या सुधारणेसह पाकिस्तानच्या जागी पाचव्या स्थानावर कब्जा केला आहे. त्यापाठोपाठ आता पाकिस्तानचा नंबर लागतो. बांगालदेशच्या संघ या विजयास आठव्या स्थानावर पोहचला आहे.

WTC गुणतालिकेत कोण कितव्या स्थानी?

WTC च्या नव्या चक्रात ऑस्ट्रेलियन संघ ८७.५० टक्के विनिंग पर्सेंटसह अव्वलस्थानी आहे. त्यापाठोपाठ न्यूझीलंड (७७.७८ विजयाची टक्केवारी), दक्षिण आफ्रिका (७५ विजयाची टक्केवारी) आणि श्रीलंका (६६.६७ विजयाची टक्केवारी) हे संघ आघाडीच्या चारमध्ये आहेत. टीम इंडिया ९ कसोटी सामन्यातील ४ विजयासह ४८.१५ विनिंग पर्सेंटेजसह पाचव्या स्थानी आहे.

पाकिस्तानला दणका

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी बांगलादेशचा संघ WTC गुणतालिकेत आठव्या स्थानावर होता. आता घरच्या मैदानातील ऐतिहासिक विजयासह ते  ४४.४४ विनिंग पर्सेंटेजसह टीम इंडियापाठोपाठ सहाव्या स्थानावर आहेत. आतापर्यंत खेळलेल्या दोन तीन सामन्यातील दुसऱ्या विजयाह त्यांनी मोठी झेप घेतली आहे. त्यानंतर पाकिस्तान सातव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानने ३ पैकी फक्त १ सामना जिंकला असून त्यांच्या विजयाची टक्केवारी ३३.३३ इतकी आहे.  इंग्लंडचा संघ १० सामन्यातील ३ विजयासह ३१.६७ विनिंग पर्सेंटेजसह नवव्या तर वेस्ट इंडिजचा संघ ४.१७ विनिंग पर्सेंटेजसह तळाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bangladesh's Historic Win Over Pakistan Boosts India in WTC Table

Web Summary : Bangladesh's victory over Pakistan in the first Test shifts the WTC points table. India benefits, moving up to fifth place due to Pakistan's loss. Australia leads the table, followed by New Zealand and South Africa.
टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाबांगलादेशपाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ