1 / 9मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी कोकणात आपल्या गावी सुटी एन्जॉय करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.2 / 9सोशल मीडियावर त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करत सोबत रम्य निसर्गाचे फोटो शेअर केलेत.3 / 9समाजकारण आणि राजकारणाच्या या अखंड धावपळीत अनेकदा स्वतःसाठी दोन क्षण काढणेही दुरापास्त होते, असे रितू तावडे यांनी लिहिले आहे.4 / 9रितू तावडे म्हणतात की, गावाला जाऊन मनाला एक वेगळीच उभारी मिळाली. निसर्गरम्य वातावरणात, झोपाळ्यावर बसून झोका घेत त्यांनी मनसोक्त वेळ घालवला.5 / 9समाजकारण आणि राजकारणाच्या या अखंड धावपळीत अनेकदा स्वतःसाठी दोन क्षण काढणेही दुरापास्त होते, असे रितू तावडे यांनी लिहिले आहे.6 / 9शहरातल्या गजबजाटापासून दूर, त्या थंड हवेच्या झुळुकीत झोपाळ्यावर डुलकी घेताना जो आनंद मिळाला, तो शब्दांत सांगता येणार नाही, असे त्यांनी लिहिले.7 / 9पुढे त्या म्हणतात, खूप दिवसांनी अशी गाढ आणि शांत झोप लागली, ज्यामुळे मनावरचा सगळा ताण हलका झाला. ती 'मजा' काही वेगळीच होती! या विश्रांतीमुळे शरीराला पुन्हा चैतन्य मिळाले.8 / 9मनाला खूप बरं वाटलंय. आता पुन्हा एकदा त्याच जोमाने आणि उत्साहाने तुमच्या सेवेसाठी मी सज्ज आहे, असे वचन रितू तावडे यांनी दिले आहे.9 / 9सर्व फोटो सौजन्य- रितू तावडे सोशल मीडिया