Mumbai Crime:मुंबई पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे. भायखळा येथील डॉकयार्ड रोड परिसरात सोमवारी सायंकाळी भरवस्तीत समीर आसिफ शेख (३८) या व्यक्तीवर अज्ञातांनी गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात मोठी घबराट पसरली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास समीर शेख हे हॉटेल सायबानच्या ऑफिसमध्ये जात असताना मागून आलेल्या बाईकस्वारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोर दुचाकीवरून आले होते आणि त्यांनी दोन राऊंड फायर केल्याचे स्थानिकांनी सांगितले. यातील एक गोळी समीर यांच्या कमरेत लागली, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू; प्रकृती स्थिर
गोळीबाराच्या या घटनेनंतर जखमी समीर यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही. या घटनेची माहिती मिळताच भायखळा पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले असून घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत. हा गोळीबार जुन्या वादातून झाला की यामागे काही वेगळे कारण आहे, याचा सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत.
Web Summary : Firing in Mumbai's Dockyard Road injured Samir Sheikh. Bike-borne assailants fired two rounds, hitting him in the waist. He is hospitalized and stable. Police are investigating the incident, examining CCTV footage to identify the shooters and determine the motive.
Web Summary : मुंबई के डॉकयार्ड रोड पर फायरिंग में समीर शेख घायल। बाइक सवार हमलावरों ने दो राउंड फायर किए, एक गोली कमर में लगी। वह अस्पताल में है और स्थिर है। पुलिस जांच कर रही है, सीसीटीवी फुटेज खंगाल रही है।