Mumbai JJ Hospital Doctor Suicide: मुंबईतीलजे. जे. रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागात कार्यरत असलेल्या प्रथम वर्ष निवासी डॉक्टरने मंगळवारी वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. अभयसिंह मोरे असे डॉक्टरचे नाव असून ते मागील काही महिन्यांपासून मानसिक तणाव आणि नैराश्याने त्रस्त होते. अभयसिंह मोरे फेब्रुवारीमध्ये जे. जे. रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून रुजू झाले होते. ते मागील काही महिन्यांपासून मानसिक तणाव आणि नैराश्याचा सामना करत होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते.
कशी उघडकीस आली घटना?
मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे रेडिओलॉजी विभागात कामासाठी आले नाहीत. त्यामुळे दुपारी त्यांचे काही सहकारी त्यांना पाहण्यासाठी वसतिगृहात गेले. त्यावेळी वसतिगृहातील खोलीत त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे निवासी डॉक्टरांवरील ताणतणाव आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अभयसिंग यांच्यावर सुरू होते मानसोपचार
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी १२ मे रोजी दुपारी डॉक्टर निवास येथील रेडिओलॉजीच्या पहिल्या वर्षाला शिकत असलेले डॉक्टर अभयसिंग नरसिंग मोरे यांनी आत्महत्या केली. २६ वर्षीय डॉक्टर अभयसिंग यांनी सर जे. जे. हॉस्पिटल कंपाऊंडच्या नर्सिंग हॉस्टेलमधील सहाव्या मजल्यावरील रूम नंबर ६०४ मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ते मूळचे दसेमगाव (तालुका वाशी, जि. धाराशिव) येथील होते. त्यांच्यावर मानसोपचार सुरु होते आणि त्याची औषधेही चालू होती. नैराश्यामुळे (डिप्रेशन) त्यांनी राहत्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
Web Summary : A resident doctor at Mumbai's JJ Hospital died by suicide in his hostel room. Dr. Abhaysingh More, a radiology resident, was reportedly suffering from depression. He was found hanging, prompting investigations and highlighting doctors' mental health challenges.
Web Summary : मुंबई के जे. जे. अस्पताल में एक रेजिडेंट डॉक्टर ने अपने छात्रावास के कमरे में आत्महत्या कर ली। रेडियोलॉजी निवासी डॉ. अभयसिंह मोरे कथित तौर पर अवसाद से पीड़ित थे। वह फांसी पर लटका हुआ पाया गया, जिससे जांच शुरू हो गई और डॉक्टरों के मानसिक स्वास्थ्य की चुनौतियां सामने आईं।