Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी

यंदाच्या हंगामात ५०० धावांचा आकडा गाठणारा पहिला

By सुशांत जाधव | Updated: May 12, 2026 21:32 IST

Open in App

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शन याने सलग तिसऱ्या अर्धशतकासह खास विक्रमी डाव साधला. हार्दिक पांड्याचा विक्रम मोडीत काढत त्याने कर्णधार शुभमन गिलच्या खास विक्रमाशी बरोबरी केली आहे. गुजरात टायटन्सच्या संघाकडून साई सुदर्शन याने दुसऱ्यांदा सलग तीन अर्धशतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. गिलनेही दोन वेळा अशी कामगिरी केली असून हार्दिक पांड्याने २०२२ च्या हंगामात एकदा अशी कामगिरी केली होती. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

साईनं हार्दिकचा रेकॉर्ड मोडला अन्...

हार्दिक पांड्याने २०२२ च्या हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना सलग ३ अर्धशतके झळावली होती. या हंगामात त्याने संघाला पदार्पणात जेतेपदही मिळवून दिले होते. त्यानंतर साई सुदर्शन याने २०२४-२५ च्या हंगामात सलग तीन अर्धशतके झळावत हार्दिक पांड्याची बरोबरी केली. आता यंदाच्या हंगामातील सलग तिसऱ्या अर्धशतकासह पांड्याला मागे टाकत साईनं कर्णधार शुभमन गिलच्या विक्रमाशी बरोबरीचा डाव साधला. गिलनं गत हंगामासह यंदाच्या हंगामात सलग तीन अर्धशतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे. 

GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; पठ्ठ्यानं अंपायरचा निर्णय बदलाय...

यंदाच्या हंगामात ५०० धावांचा आकडा गाठणारा पहिला

साई सुदर्शन याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात संघ अडचणीत असताना ४४ चेंडूत ५ चौकार आणि २ अर्धशतकासह ६१ धावांची खेळी केली. यासह तो  यंदाच्या हंगामात ५०० धावांचा आकडा गाठणारा पहिला फलंदाज ठरला. १२ सामन्यातील १२ डावात त्याने ५०१ धावा करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आपली दावेदारी भक्कम केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sai Sudharsan's Half-Century Spree Equals Gill's Record, Surpasses Pandya!

Web Summary : Sai Sudharsan's consistent half-centuries for Gujarat Titans set a new record. He surpassed Hardik Pandya and equaled Shubman Gill, becoming the first to 500 runs this season with a crucial innings against Sunrisers Hyderabad.
टॅग्स :आयपीएल २०२६गुजरात टायटन्ससनरायझर्स हैदराबादशुभमन गिलहार्दिक पांड्या