शहरं
Join us  
Trending Stories
1
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
2
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
3
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
4
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
5
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
8
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
9
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
10
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
11
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
12
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
13
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
16
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
17
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
18
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
20
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
Daily Top 2Weekly Top 5

सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 20:16 IST

Deputy CM Sunetra Pawar In Guwahati: सर्वांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदी आयुष्यासाठी मनोभावे प्रार्थना केली, असे सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले आहे.

Deputy CM Sunetra Pawar In Guwahati:आसाममधील मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांच्या आयोजित शपथविधी सोहळ्यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजितदादा पवार यांनी गुवाहाटी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली. गुवाहाटी येथे पोहोचल्यावर सुनेत्रा अजित पवार यांनी आसामचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैचारिक वारशाचा आधारस्तंभ असलेले दिवंगत शरतचंद्र सिन्हा यांच्या पुतळ्याला वंदन केले. 

राज्यसभा खासदार पार्थ पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक हे उपस्थित होते. कार्यालयात झालेल्या या संवादादरम्यान सुनेत्रा अजित पवार यांनी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आसाममधील महिलांशी सौहार्दपूर्ण चर्चा केली. या संवादादरम्यान, सुनेत्रा अजित पवार यांनी दिवंगत अजितदादा पवार यांना आदरांजली वाहिली आणि त्यांचा आदर्श, संघर्ष आणि संघटनात्मक वारसा देशभरात पसरवण्याचा आपला निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केला.

आसाममध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अस्तित्व अधिक मजबूत होईल

या संवादादरम्यान खासदार पार्थ पवार यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि युवक कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि संघटनात्मक बाबीवर सविस्तर चर्चा केली. यावेळी भविष्यात ईशान्य भारतासह आसाममध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अस्तित्व अधिक मजबूत होईल आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्ष महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास पार्थ पवार यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आसाममधील कामाख्या देवी मंदिर येथे जाऊन आदिशक्ती माता कामाख्या देवीचे पवित्र दर्शन घेतले. नीलाचल पर्वतावर वसलेल्या या शक्तीपीठात मातेच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदी आयुष्यासाठी मनोभावे प्रार्थना केली. यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री  रेखा गुप्ता यांची सदिच्छा भेट झाली. तसेच महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांशी आत्मीय संवाद साधला, असे सुनेत्रा पवार यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sunetra Pawar Visits Guwahati, Seeks Blessings, Pledges to Carry Forward Legacy

Web Summary : Sunetra Pawar visited Guwahati, engaging with party workers and paying respects to leaders. She affirmed her commitment to spreading Ajit Pawar's ideals nationally. Pawar also visited the Kamakhya Devi temple, praying for prosperity and good health.
टॅग्स :Sunetra Pawarसुनेत्रा पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAssamआसामparth pawarपार्थ पवारAjit Pawarअजित पवार