शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
6
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
9
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
10
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
13
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
16
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
17
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
18
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
19
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
20
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 17:57 IST

एका नवविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण विशाखापट्टणम परिसर हादरून गेला आहे.

एका नवविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण विशाखापट्टणम परिसर हादरून गेला आहे. श्रीकाकुलम येथील रहिवासी असलेल्या तेजश्रीच्या लग्नाला केवळ दोन महिने झाले होते, मात्र हुंड्याच्या हव्यासापोटी तिच्या पतीने तिचं आयुष्य हिरावून घेतलं. पती याला आत्महत्या म्हणत असला, तरी पोलीस तपास आणि शरीरावरील जखमांच्या खुणा ही एक सुनियोजित हत्या असल्याचे दर्शवत आहेत.

तेजश्रीच्या पालकांनी आपल्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी श्रीकाकुलमच्या अरगोलू येथील दप्पा सोमेश्वर राव याची जावई म्हणून निवड केली होती. लग्नापूर्वी सोमेश्वरने आपण विशाखापट्टणम डॉकयार्डमध्ये कर्मचारी असल्याचं सांगितलं होतं. तसेच रामा टॉकीज परिसरात आपलं एक हॉस्टेल असून त्यातून महिन्याला २ लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचा खोटा दावाही त्याने केला होता.

"मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलंय"

मुलीला श्रीमंत आणि सुरक्षित घर मिळत आहे या आशेने पालकांनी कर्ज काढून ६ मार्च रोजी थाटामाटात लग्न लावून दिलं. हुंडा म्हणून १८ लाख रुपये रोख, १९ तोळं सोनं आणि इतर वस्तू असा एकूण २८ लाखांहून अधिक खर्च करण्यात आला. पण हे सर्व केवळ एक जाळे होते. लग्नानंतर सोमेश्वर जेव्हा तेजश्रीला विशाखापट्टणमच्या रेसापुवनिपलेम येथील घरी घेऊन गेला, तेव्हापासूनच त्याचं खरं रूप समोर आलं. पोलीस तपासात उघड झालं आहे की, सोमेश्वरने तेजश्रीला स्पष्टपणे सांगितलं होतं की, "सौंदर्यासाठी नाही, तर मी केवळ पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं आहे." 

हुंडा आणण्यासाठी त्रास

विशाखापट्टणममध्ये आल्यापासूनच तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार सुरू झाले. आरोपी तिला आणखी हुंडा आणण्यासाठी त्रास देऊ लागला. इतकेच नाही तर सोमेश्वरचे इतर मुलींशीही संबंध असल्याचे पोलिसांना समजले आहे, ज्यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असत. ७ तारखेला जेव्हा तेजश्रीची आई शारदा यांनी मुलीची विचारपूस करण्यासाठी फोन केला, तेव्हा अनेकदा रिंग जाऊनही फोन उचलला गेला नाही. शेवटी जावई सोमेश्वरने फोन उचलला आणि तेजश्रीने गळफास घेतल्याचं सांगितलं. हे ऐकताच कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली.

कुटुंबाने केला आरोप

जेव्हा आई-वडील विशाखापट्टणम येथे पोहोचले, तेव्हा त्यांना त्यांची मुलगी पलंगावर मृतावस्थेत आढळली. तेजश्रीच्या शरीरावर अनेक खुणा होत्या आणि  सोमेश्वरने आधी तिला बेदम मारहाण केली आणि नंतर गळा दाबून तिची हत्या केली, जेणेकरून या हत्येला आत्महत्येचं स्वरूप देता येईल, असा थेट आरोप कुटुंबाने केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Dowry death: Husband kills wife after admitting he married for money.

Web Summary : Vishakhapatnam newlywed's death shocks. Husband killed her for dowry after admitting marriage was for money, not love. Family alleges murder masked as suicide. Police investigate.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdowryहुंडाDeathमृत्यू