सनातन धर्माला सातत्याने टिकेचं लक्ष्य करणारे एम.के.स्टॅलिन आणि त्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्या द्रमुक पक्षाला नुकत्याच झालेल्या तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा सनातन धर्माला लक्ष्य केलं आहे. तामिळनाडू विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या उदयनिधी स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री विजय यांच्यासमोरच ‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, असं विधान केलं.
याआधी सत्तेवर असलेल्या द्रमुक पक्षाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू-मलेरियाशी केली होती. तसेच ज्याप्रकारे या आजारांना संपवलं जातं. त्याचप्रमाणे सनातन धर्मालाही संपवलं पाहिजे. उदयनिधी यांच्या या विधानावरून खूप वाद झाला होता. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. मात्र आता उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा तशाच प्रकारचं विधान केलं आहे.
विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून बोलताना उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, विरोधी पक्षनेता म्हणून बोलण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. मी अण्णादुराई, कलैगनार, डीएमकेचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे आभार मानतो. त्यांनी देशासमोर एक वस्तुपाठ घालून दिलेला आहे. विरोधात बसो वा सत्ते बसो डीएमके हा केवळ एक विरोधी पक्ष नाही तर एक शक्तिशाली पक्ष बनेल. तामिळनाडूच्या हितासाठी आपण मिळून काम केलं पाहिजे,असेही उदयनिधी यांनी सांगितले. तसेच यावेळी उदयनिधी यांनी सनातन धर्माला संपवलंच पाहिजे, असं विधान केलं. त्यावर विजय यांनी हात जोडत प्रतिसाद दिला.
यावेळी मी आणि मुख्यमंत्री विजय एकाच कॉलेजमध्ये शिकलो असल्याचे सांगितले. मात्र राजकारणात आम्ही वरिष्ठ आहोत. त्यामुळे सरकार चालवताना आमचा सल्ला घ्यावा, असेही विजय यांना सांगितल.
Web Summary : Udayanidhi Stalin, facing past criticism for comparing Sanatan Dharma to diseases, repeated his call for its abolishment before Chief Minister Vijay in the assembly. Vijay responded with folded hands. Stalin emphasized working together for Tamil Nadu's benefit.
Web Summary : सनातन धर्म की तुलना बीमारियों से करने के लिए पिछली आलोचना का सामना कर रहे उदयनिधि स्टालिन ने विधानसभा में मुख्यमंत्री विजय के सामने इसे खत्म करने का आह्वान दोहराया। विजय ने हाथ जोड़कर जवाब दिया। स्टालिन ने तमिलनाडु के लाभ के लिए मिलकर काम करने पर जोर दिया।