बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटही याही वर्षी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी झाली आहे. कान्समधील तिच्या लूक्स कडे चाहत्यांचं विशेष लक्ष लागलं आहे. दरम्यान आलियाचा पहिला लूक इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. प्रिन्सेस स्टाईल गाऊनमध्ये आलिया जणू परीच दिसत आहे. तयार होऊन बाहेर पडतानाचा तिचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
कान्स रेड कार्पेटवरील आपल्या मुख्य एन्ट्रीपूर्वी आलिया भट फ्रेंच रिव्हेरा येथे आली. विमानतळावर साध्या पण स्टायलिश लूकमध्ये दिसल्यानंतर आता 'प्रिन्सेस-कोअर' गाऊनमध्ये ती ग्लॅमरस दिसत आहे. आलियाने मिंट-ग्रीन रंगाचा मिडी बॉल ड्रेस परिधान केला आहे, जो दिसायला अत्यंत क्लासिक आणि मोहक आहे. या ड्रेसचे स्ट्रॅपी स्लीव्हज आणि प्लंजिंग नेकलाईन तिच्या लूकला बोल्ड टच देत आहेत. या ड्रेसचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याचा घेरदार आणि कल्पकतेने डिझाइन केलेला स्कर्ट, ज्यामुळे आलियाला एखाद्या परीसारखा लूक मिळाला आहे.
या ड्रेसवर फुलांच्या आणि पानांच्या डिझाइनचे अतिशय नाजूक वर्क केलेले आहे. ज्यामुळे संपूर्ण आउटफिटला एक 'गार्डन-एस्थेटिक' फिल मिळत आहे. ड्रेसवर असलेल्या छोट्या-छोट्या डिटेल्समुळे हा लूक अधिकच मोहक आणि स्वप्नवत वाटत होता. स्वतःच्या ड्रेसला अधिक हायलाईट करण्यासाठी आलियाने ज्वेलरीचा वापर अतिशय कमी केला आहे.
फॅशनसोबतच आलियाच्या मेकअपचीही मोठी चर्चा रंगली आहे. तिने आपला मेकअप नॅचरल आणि ग्लोईंग ठेवला आहे, ज्याला 'सिग्नेचर आलिया लूक' म्हटले जाते. चेहऱ्यावरचा हलका ग्लो, न्यूड लिप्स आणि स्लीक साईड-पार्टेड बन यामुळे तिचा हा लूक अधिकच सोफिस्टिकेटेड दिसत आहे. किमान ॲक्सेसरीज आणि पांढऱ्या हिल्ससह 'लेस इज मोर' हा फॅशन मंत्र तिने सेट केला आहे.
Web Summary : Alia Bhatt's Cannes Film Festival look is captivating. She appeared in a mint-green gown, embodying a princess-like aesthetic with delicate floral designs and a natural makeup look, minimal jewelry, and white heels.
Web Summary : आलिया भट्ट कान्स फिल्म फेस्टिवल में मिंट-ग्रीन गाउन में राजकुमारी जैसी लग रही थीं। नाजुक फ्लोरल डिजाइन, नेचुरल मेकअप, कम ज्वेलरी और सफेद हील्स के साथ उनका लुक मनमोहक था।