शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 14:40 IST

1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी कमी करण्याचे आवाहन केले असून, त्यामुळे भविष्यात दागिन्यांच्या मागणीत घट होऊ शकते. लोक आता वजनाने हलके दागिने किंवा ‘डिजिटल गोल्ड’कडे वळण्याची शक्यता आहे­.
2 / 5
सोन्यासाठी डॉलरची मागणी वाढल्याने रुपयाचे मूल्य घसरते, ज्यामुळे परदेशातून येणारे मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स सामान महाग होते.
3 / 5
डॉलर रिझर्व्ह कमी झाल्यामुळे महागाई वाढल्यास आरबीआय व्याजदर चढेच ठेवू शकते, ज्यामुळे गृह किंवा इतर कर्ज महाग राहू शकतात.
4 / 5
परकीय चलन साठ्यात घट झाल्यामुळे देशाची ‘चालू खात्यातील तूट’ वाढते. यामुळे आयातीसाठी अधिक पैसे मोजावे लागून देशात महागाई वाढते.
5 / 5
पंतप्रधानांच्या आवाहनामुळे रत्ने, आभूषण उद्योगातही चिंतेचे वातावरण आहे. अखिल भारतीय रत्न आणि आभूषण परिषदेनुसार या उद्योगाशी थेट आणि अप्रत्यक्षरीत्या एक कोटींहून अधिक रोजगार जोडलेले आहेत. सोन्याची मागणी घटल्यास किरकोळ विक्री, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स आणि डिझाइन क्षेत्रालाही फटका बसू शकतो.
टॅग्स :GoldसोनंInvestmentगुंतवणूकIndiaभारत