1 / 7उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जर तुम्हीही फॅमिलीसोबत एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा बेत आखत असाल आणि शिमला-मनालीच्या गर्दीला कंटाळला असाल, तर आम्ही तुमच्यासाठी हिमाचल प्रदेशातील एक अशा 'सिक्रेट' जागेची माहिती घेऊन आलो आहोत, जिथे गेल्यावर तुम्हाला पृथ्वीवरील स्वर्गाचा अनुभव येईल. 2 / 7हे ठिकाण म्हणजे कुल्लू जिल्ह्यातील सैंज व्हॅलीमध्ये वसलेले 'शानगड'. विशेष म्हणजे पर्यटकांमध्ये 'मिनी थायलंड' म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'जिब्बी'पासून शानगड अवघ्या ३ तासांच्या अंतरावर आहे. 3 / 7शहराचा गजबजाट, ट्रॅफिक आणि गोंगाटापासून दूर शांततेत चार क्षण घालवायचे असतील, तर शानगड हा तुमच्यासाठी परफेक्ट प्लॅन ठरू शकतो. उंच देवदार वृक्ष, हिरवेगार मखमली गालिचे आणि ढगांनी वेढलेले डोंगर ही या ठिकाणाची ओळख आहे.4 / 7निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंगची आवड असलेल्या लोकांसाठी शानगड म्हणजे पर्वणीच आहे. 'शानगड मीडोज' हे इथलं मुख्य आकर्षण आहे. चहूबाजूंनी देवदारच्या जंगलांनी वेढलेले हे अथांग हिरवेगार मैदान पाहून तुमचं मन प्रसन्न होईल. 5 / 7इथला निसर्गाच्या कुशीत असलेला 'बरशानगड धबधबा' हा धबधबा पर्यटकांना भुरळ घालतो. जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल, तर इथून तुम्ही ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कच्या दिशेने जाणारे ट्रेक्स एक्सप्लोर करू शकता.6 / 7दिल्लीपासून शानगड साधारण ५०० किमी अंतरावर आहे. दिल्लीच्या काश्मिरी गेटवरून तुम्ही कुलू-मनालीकडे जाणारी बस पकडून 'ऑट' या ठिकाणी उतरू शकता. तिथून खाजगी टॅक्सी किंवा लोकल बसने ४० किमी अंतरावर असलेले शानगड गाठता येते.7 / 7जर, स्वतःच्या गाडीने जात असाल तर साधारण ८ ते १० तासांच्या प्रवासात तुम्हाला हिमालयातील नयनरम्य घाटांचा आनंद घेता येईल.