शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 15:41 IST

NEET Exam Paper Leak : नीट परीक्षा रद्द होण्यावरून आणि पेपर लीकच्या प्रकरणावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणाचा तपास आता सीबीआय (CBI) कडे सोपवण्यात आला असून सीबीआयने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

नीट परीक्षा रद्द होण्यावरून आणि पेपर लीकच्या प्रकरणावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणाचा तपास आता सीबीआय (CBI) कडे सोपवण्यात आला असून सीबीआयने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आतापर्यंत राजस्थान पोलिसांचा विशेष ऑपरेशन ग्रुप (SOG) या प्रकरणाचा तपास करत होता. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात ४५ जणांना ताब्यात घेतलं आहे.

हे संपूर्ण प्रकरण एका 'गेस पेपर'मुळे सुरू झाल्याचं समोर आलं आहे. या गेस पेपरमधील ७२० पैकी सुमारे ६०० गुणांचे प्रश्न खऱ्या परीक्षेशी तंतोतंत जुळत होते. यामध्ये केरळमधील एका एमबीबीएस (MBBS) विद्यार्थ्याचं कनेक्शन समोर येत असून, त्यानेच हा गेस पेपर आपल्या वडिलांना मेसेजद्वारे पाठवला होता. 

मुलाने पीजी चालवणाऱ्या वडिलांना पाठवला पेपर 

आरोपीचे वडील पीजी चालक आहेत. त्यांनीच आपल्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींना हा पेपर दिला होता. असा दावा केला जात आहे की, परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांपर्यंत जो गेस पेपर पोहोचला होता, त्यातूनच हा पेपर लीक झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, इंटेलिजन्स ब्युरो (IB) कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे SOG ने डेहराडून, सीकर आणि झुंझुनू येथे मोठी कारवाई करत अनेक संशयितांना ताब्यात घेतलं.

कसं उघड झालं प्रकरण?

ताब्यात घेतलेल्यांमध्ये सीकरमधील एका नामांकित कोचिंग संस्थेशी संबंधित करिअर समुपदेशकाचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. परीक्षा होण्याच्या दोन दिवस आधीच हा गेस पेपर निवडक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की, प्रश्नपत्रिकेतील मोठ्या संख्येने प्रश्न त्या पेपरशी जुळत आहेत.

"उद्या हाच पेपर येईल”

या प्रकरणाचा तपास पुढे सरकल्यावर केरळमध्ये एमबीबीएस करणाऱ्या विद्यार्थ्याचा सहभाग स्पष्ट झाला. केरळमध्ये एमबीबीएस करणाऱ्या विद्यार्थ्याने २ मे रोजी सीकरमधील आपल्या वडिलांना मोबाईलवर गेस पेपर पाठवला. "पप्पा, उद्या हाच पेपर येईल, तुमच्या हॉस्टेलमधील मुलींना हा देऊन टाका" असं मेसेजमध्ये लिहिलं होतं. पीजी हॉस्टेल चालकाने ३ मे च्या सकाळी तो गेस पेपर मुलींना दिला. 

हॉस्टेल चालकाने एका कोचिंग क्लासच्या व्यक्तीला तो पेपर दाखवून विचारलं की, यातले किती प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत येऊ शकतात? नीट परीक्षेतील बायोलॉजीचे सर्व ९० प्रश्न, २०० प्रश्नांच्या त्या गेस पेपरमध्ये होते. केमिस्ट्रीचे सर्व ४५ प्रश्न, ८१ प्रश्नांच्या गेस पेपरमधून आले होते. विशेष म्हणजे, या गेस पेपरमध्ये स्वल्पविराम (comma) किंवा पूर्णविराम (full stop) ची ही चूक नव्हती, प्रश्न जसेच्या तसे होते.

६०० गुणांचे १५० प्रश्न सेम

राजस्थान SOG च्या तपासात समोर आलं आहे की, त्या गेस पेपरमध्ये सुमारे ४१० प्रश्न होते. असा दावा केला जात आहे की, त्यातील सुमारे १५० प्रश्न (जे एकूण ६०० गुणांचे होते) NEET UG २०२६ च्या प्रश्नपत्रिकेत जसेच्या तसे विचारण्यात आले होते. नीट परीक्षा एकूण ७२० गुणांची असते, अशा परिस्थितीत इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रश्न जुळणे ही अतिशय गंभीर बाब मानली जात आहे. तपास सूत्रांनुसार, या 'क्वेश्चन बँक'ची लिंक केरळमधील मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या त्याच तरुणाशी जोडली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : NEET Paper Leak: Kerala Connection Exposed, Questions Leaked to Hostel Girls

Web Summary : NEET paper leak investigation reveals a Kerala MBBS student's involvement. He allegedly sent a 'guess paper' with strikingly similar questions to his father, a PG owner, who then shared it with hostel residents. CBI investigates; Rajasthan police arrested 45.
टॅग्स :neet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीकKeralaकेरळStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय