या उन्हाळ्यात टरबुजाचीच जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबईत टरबूज खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला. यानंतर, छत्तीसगडमध्येही टरबूज खाल्ल्यानंतर लेगेच चिकन खाल्ल्याने फूड पॉयझनिंगचा प्रकार समोर आला. यात एकाचा मृत्यू झाला. यामुळे आपण योग्य पद्धतीने टरबूज खात आहोत की नाही? असा प्रश्न उपस्थित होतो. यासंदर्भात, प्रसिद्ध डॉक्टर विनोद शर्मा यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत टरबूज खाण्याच्या योग्य पद्धतीसंदर्भात माहिती दिली आहे.
टरबूजमध्ये व्हिटॅमिन A, C, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि 'लायकोपीन' सारखे अँटिऑक्सिडंट्स असतात. यात ९० टक्के पाणी आणि 'सिट्रुलिन' नावाचे अमिनो ॲसिड असते. जे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास आणि मेंदू शांत ठेवण्यास मदत करते.
रात्री टरबूज खाऊ नये -
रात्री टरबूज कधीही खाऊ नका. टरबूज पचायला जड असल्याने रात्रीच्या वेळी ते व्यवस्थित पचत नाही, यामुळे उलट्या आणि जुलाब होऊ शकतात.
टरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे -
टरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते. यामुळे ॲसिडिटी, पोट फुगणे अथवा पोटात मुरडा येणे, आदी समस्या उद्भवतात.
टरबूज खाण्यापूर्वी मुसालेदार अथवा जड अन्न खाऊ नये -
टरबूज खाण्यापूर्वी किंवा नंतर चिकन-मटण अथवा मसालेदार पदार्थ खाणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. छत्तीसगड आणि मुंबईतील प्रकरणांमध्ये काहीसे असेच जाणवून आले आहे.
मग टरबूज खाण्याची योग्य पद्धत काय -
टरबूज खाण्यासाठी दुपारची वेळ उत्तम. सकाळी नाश्त्यातही ते घेता येईल, मात्र रिकाम्या पोटी खाणे टाळावे. टरबूज खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास पाणी पिऊ नका. तसेच टरबूज अधिक प्रमाणात न खाता केवळ २-३ स्लाईस खाणेही पुरेसे आहे. महत्त्वाचे म्हणजे, बराच वेळ कापून ठेवलेले टरबूज खाणे टाळ. ते ताजे कापून खाणेच आरोग्यासाठी हितकारक आहे.
Web Summary : Avoid watermelon at night, don't drink water immediately after eating. Consuming non-veg or spicy food before/after is harmful. Best time to eat watermelon is afternoon. Eat fresh, limit to 2-3 slices.
Web Summary : रात में तरबूज खाने से बचें, खाने के तुरंत बाद पानी न पिएं। पहले/बाद में मांसाहारी या मसालेदार भोजन का सेवन हानिकारक है। तरबूज खाने का सबसे अच्छा समय दोपहर है। ताजा खाएं, 2-3 स्लाइस तक सीमित करें।