1 / 15Apara Ekadashi May 2026 Astrology: बुधवार, १३ मे २०२६ रोजी वैशाख वद्य पक्षातील अपरा एकादशी आहे. मराठी वर्षात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. अपरा एकादशी पुण्यफलदायी आहे, असे मानले जात आहे. 2 / 15अपरा एकादशीच्या दिवशी बुध, मंगळ आणि सूर्य यांचा चांगला योग जुळून आलेला आहे. मंगळ स्वराशीत आहे. सूर्य आणि बुध यांच्या युतीने बुधादित्य योग जुळून आलेला आहे. तसेच मंगळ आणि सूर्याचा आदित्य मंगल योग जुळून आलेला आहे. 3 / 15आदित्य मंगल आणि बुधादित्य हे राजयोग मानले जात असून, याचा अनेक राशींना उत्तम फायदा होणार आहे. कुटुंब, नोकरी, व्यवसाय, व्यापार, आर्थिक आघाडीवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...4 / 15मेष: वेळेचे नियोजन चांगले कराल. मात्र, काही बदल झाल्यामुळे आपल्या आवडी-निवडींच्या बाबतीत अधूनमधून मुरड घालावी लागेल. नवनवीन कल्पना विकसित होतील. व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक प्राप्ती होईल. मात्र, देवाण-घेवाण करताना खबरदारी घ्या. काही अनपेक्षित अडचणी येऊ शकतात. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. अनुकूलता अनुभवायला मिळेल. विवाह जुळण्याच्या दृष्टीने हालचाली वेग घेतील.5 / 15वृषभ: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. नोकरीत अचानक काही बदल होऊ शकतात. ते फायद्याचे ठरतील. त्यामुळे बदलांकडे सकारात्मक पद्धतीने बघा. धनलक्ष्मीची कृपा राहील. मात्र, आर्थिक व्यवहार जपून करा. काही लोक चुकीचा सल्ला देतील. अनोळखी लोकांपासून योग्य अंतर ठेवा. काही अचानक खर्च होऊ शकतो. प्रवासात सतर्क राहा. वाहन हळू चालवा.6 / 15मिथुन: पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. मात्र, प्रवासाचे नीट नियोजन करा. म्हणजे प्रवासाचा आनंद लुटता येईल. नोकरीत असणाऱ्यांना नवीन जबाबदारी मिळेल. त्यामुळे सोयी-सुविधा वाढवून मिळतील. नातेवाइकांच्या भेटीसाठी होतील. कार्यक्षेत्रातील कामे व घरगुती जबाबदाऱ्यांचा ताळमेळ साधताना धावपळ होईल. अचानक धनलाभ होईल. भेटवस्तू प्राप्त होतील. विवाह जुळण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे.7 / 15कर्क: मान-सन्मान मिळेल. काही अडचणी असतील. थोडे सबुरीचे धोरण ठेवा. वाहने हळू चालवा, अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. हळूहळू परिस्थिती आटोक्यात येईल. अडचणी दूर होतील. चांगल्या - बातम्या कानावर पडतील, मौजमजा करण्यासाठी प्रवास घडून येईल. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल. त्यामुळे पगारवाढ व सोयी-सुविधा मिळतील. वरिष्ठांकडून प्रशस्तीपत्र मिळेल. घरात लगबग राहील.8 / 15सिंह: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. मनात काळजीचे विचार राहतील. कामात अनपेक्षित बदल होऊ शकतात. व्यवसायात लाभ होईल. मात्र, दगदग, धावपळ करावी लागेल. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील. कुणाशी किती जवळीक करावी, हे विचारपूर्वक ठरवा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. एखादे काम खूप जास्त वेळ खाऊ शकते. सगळ्या अडचणी दूर होतील.9 / 15कन्या: महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घेतले पाहिजेत. लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका, विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. आरोग्याची काळजी घ्यावी. आहाराचे पथ्य पाळले पाहिजे. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. जीवनसाथीची चांगली साथ राहील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाची कामे अचानक अडचण आल्याने पुढे ढकलावी लागतील. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो.10 / 15तूळ: योजना गुप्त ठेवा. अनुकूल वातावरण राहील. महत्त्वाची कामे करताना सुरुवातीला झपाटा विलक्षण राहील. मात्र, काही लोक काम वाढवण्याचा प्रयत्न करतील. काहींना जवळचा प्रवास होईल. कामात अडथळा येऊ शकतो. कामातील बदलामुळे बरेच परिश्रम करावे लागतील. तब्येतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अडचणी दूर होतील.11 / 15वृश्चिक: व्यस्त राहाल. महत्त्वाची कामे पटापट होतील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. त्यामुळे तुमचे वेळापत्रक व्यस्त राहील. घरातील कामांसाठी वेळ द्यावा लागेल. जीवनसाथीचा चांगला सहयोग राहील. मुलांशी संवाद ठेवा. त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे वाढवू नका, काही अनपेक्षित अडचणी येऊ शकतात. थोडे संयमाने वागा. योजना लोकांना सांगत बसू नका.12 / 15धनु: चंद्र भ्रमणाची अनुकूल फळे मिळतील. अपेक्षित लाभ होतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. हाताला सतत काम राहील. मात्र, देवाणघेवाण करताना थोडी खबरदारी घ्या. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. त्यामुळे महत्त्व वाढेल; पण कामाचा ताणही राहील. एखादी चांगली बातमी कळेल. त्यामुळे मन आनंदित होईल. मुलांची प्रगती होईल. प्रवास कार्यसाधक ठरेल. विवाहेच्छूना अनुकूल फळे मिळतील.13 / 15मकर: गुंतवणूक जपून करा. जमिनीचे व्यवहार ऐरणीवर येतील. मात्र, कागदोपत्री कामे करताना खबरदारी घ्या. न वाचता कुठेही सही करू नका. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा. व्यवसायात थोडी दगदग होऊ शकते. आर्थिक गुंतवणूक करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्या. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्या अडचणी समजून घ्या. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल. त्यामुळे जीवनमानाचा दर्जा उंचावला जाईल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल, घरात मंगलमय वातावरण राहील.14 / 15कुंभ: अडचणी दूर होतील. नवीन प्रकल्प आखण्यासाठी वेळ मिळेल. नोकरीत वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. व्यवसायात अचानक हाती पैसा येईल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. ज्येष्ठ मंडळींचे मार्गदर्शन मिळेल. मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. मुलांना चांगल्या संधी मिळतील.15 / 15मीन: एखाद्या कामात गुंतलेले राहाल. त्यात काही अडचणी असतील. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे. अनपेक्षित लाभ होईल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. सर्व अडचणींवर मात कराल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.