Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल

पोळी लाटण्यात परफेक्ट, पण...

By सुशांत जाधव | Updated: May 12, 2026 19:56 IST

Open in App

क्रिकेट जगतातील वंडर बॉय वैभव सूर्यवंशी हा आयपीएल २०२६ स्पर्धेतील सर्वात चर्चित खेळाडूंपैकी एक आहे. वयाच्या १५ व्या तुफान फटकेबाजीसह दिग्गज गोलंदाजांची धुलाई करणारा युवा बॅटर आता 'मास्टरशेफ' अवतारामुळे लक्षवेधी ठरताना दिसतोय. राजस्थान रॉयल्सच्या संघाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून वैभव सूर्यवंशीचा किचनमधील  खास व्हिडिओ शेअर केला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

मी मम्मीपेक्षाही परफेक्ट! 'मास्टरशेफ' वैभव सूर्यवंशी खास गोष्टीमुळे चर्चेत

राजस्थान रॉयल्सच्या संघाने युवा बॅटरचा जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात तो पोळी लाटताना दिसत आहे. "हे बघा, मी लाटलेली पोळी मम्मीच्या पोळीपेक्षाही अधिक गोल झाली आहे" असे सांगत आपण परफेक्टशेफ असल्याचा तो अभिमानाने सांगताना दिसते.  त्याचा निरागस आणि आत्मविश्वासपूर्ण अंदाज चाहत्यांना खूपच भावला असून व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सची 'बरसात' होताना दिसत आहे.

विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा

पोळी लाटण्यात परफेक्ट, पण...

 पोळी लाटून वैभव थांबला नाही, तर ती भाजतानाही तो दिसला. यावेळी त्याने प्रोफेशनल शेफसारखी पोळी हवेत उडवून पलटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा प्रयत्न फसला आणि पोळी थेट खाली पडली. त्यानंतर वैभवच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघण्याजोगे आहेत. त्याची ही ‘मास्टरशेफ’ बनण्याची  धडपड सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

वैभव सूर्यवंशीचा धमाका!  

वैभव सूर्यवंशी हा यंदाच्या हंगामात सातत्यपूर्ण दमदार कामगिरी करताना दिसला आहे. ११ सामन्यात त्याने ४४० धावा केल्या असून यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल पाचमध्ये आहे.  
वैभवचा स्ट्राइक रेट तब्बल २३६ इतका आहे. त्याने आतापर्यंत ३८ चौकार आणि ४० षटकार ठोकले आहेत. एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा खास विक्रम नावे करण्यासाठी त्याला फक्त ३ षटकारांची गरज आहे.  
 

English
हिंदी सारांश
Web Title : IPL Wonder Boy Vaibhav Suryavanshi's 'MasterChef' Avatar Goes Viral

Web Summary : IPL's Vaibhav Suryavanshi, known for explosive batting, is now charming fans with his 'MasterChef' skills. A video shared by Rajasthan Royals shows him confidently making 'better than mom' rotis. While his roti-flipping skills need work, his culinary attempt is winning hearts alongside his impressive cricket performance this season.
टॅग्स :आयपीएल २०२६राजस्थान रॉयल्सवैभव सूर्यवंशीइंडियन प्रीमिअर लीग