असहिष्णूतेच्या विषयावर भाषण झाल्यास सरकारला फटकारे लागतील या भीतीने उद्घाटक नयनतारा सहगल यांची यवतमाळच्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एन्ट्रीच साहित्य महामंडळाने रोखल्याने या संमेलनाची गरिमा व विश्वासाहर्ता संपलेली आहे. ...
गडचिरोली पोलीस स्टेशनच्या वतीने गडचिरोली शहरात रविवारी दारू विक्रेत्यांविरोधात धाडसत्र राबविण्यात आले. एकाच दिवशी नऊ ठिकाणी धाड टाकून ९ आरोपींना अटक केली आहे. एकूण ४७ हजारांची दारू जप्त केली. ...
मराठा कुणबी समाजाची उन्नती करायची झाल्यास व्यक्तीगत विचार न करता संपूर्ण समाज डोळ्यासमोर ठेवून धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले. ...
शहरातील अतिशय वर्दळीच्या अशा मार्इंदे चौकालगत असलेले अॅक्सीस बँकेचे एटीएम फोडण्यात आले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सुदैवाने चोरट्यांना एटीएममधील रोकड काढता आली नाही. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आली असून त्याचा तपास सुरू आहे. ...
दुष्काळाने संपूर्ण राज्य होरपळून निघत आहे. अशा स्थितीत बळीराजा आपल्या जीवाभावाच्या बैलजोड्या विक्रीला काढत आहे. बैलाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. तर खरेदीदार शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. ...
पत्रकारितेचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ प्रश्न विचारला आणि मोबाइलमध्ये चित्रिकरण केल्याच्या कारणावरून त्यांना थेट अटक करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...
जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिका-यांची लाखोंची लाचखोरी उघड झाली आहे. हा विभाग थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांच्याच अखत्यारीत येत असल्याने त्यांच्या अनुमती शिवाय हा प्रकार होऊ शकत नाही. त्यामुळे या २५ लाखांच्या लाचखोरी प्रकरणात जिल्हा पोलीस ...
जिल्ह्यात दुष्काळ असताना शेतकरी स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. मात्र तालुक्यातील ढाणकी व साखरा केंद्रावरून अनियमित वीज परवठा होत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेकडो हेरटवरील हरभरा पाण्यात सापडला. ...
तालुक्यातील भांब येथील नर्सरीत लावण्यात आलेली रोपटी पूर्णत: वाळली आहे. यामुळे शासनाचे ३३ कोटी वृक्ष लागवडीचे स्वप्न कसे पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...