Next

क्षुल्लक कारणावरुन गुजराती माणसाने मराठी कुटुंबीयांना केली मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:10 PM2019-09-16T12:10:29+5:302019-09-16T12:10:48+5:30

लिफ्टचा दरवाजा उघडा राहिल्याने या दोघांमध्ये वाद झाले. मात्र या वादाला मराठी विरुद्ध गुजराती अशाप्रकारे वळण आल्याने शहरात या मुद्द्यावरुन वातावरण पेटू लागलं आहे.

ठाणे - नौपाडा येथे क्षुल्लक कारणावरुन एका गुजराती कुटुंबाने मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. लिफ्टचा दरवाजा उघडा राहिल्याने या दोघांमध्ये वाद झाले. मात्र या वादाला मराठी विरुद्ध गुजराती अशाप्रकारे वळण आल्याने शहरात या मुद्द्यावरुन वातावरण पेटू लागलं आहे. सूयश अपार्टमेंटमधील हसमुख शहा यांनी राहुल पैठणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली.