Next

...त्यांच्याबद्दल बोललो तर लोक वेडे समजतील; आदित्य ठाकरेंचा नाव न घेता राणेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 12:26 PM2019-09-18T12:26:37+5:302019-09-18T12:27:06+5:30

पालघर - गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेश लांबणीवर पडला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

पालघर - गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेश लांबणीवर पडला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात पोहचली त्यानंतर राणे कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केलं. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राणेंनी लवकरच भाजपा प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे. छोट्या मोठ्या विषयावर आम्ही बोलत नाही. आम्ही कुठेही राजकीय बोलत नाही,आम्ही स्वत:च्या स्वप्नांच्या मागे जात नाही आम्ही महाराष्ट्राचे स्वप्न बघतो, आम्ही त्या बद्दल बोलायला लागलो तर लोकं आम्हाला वेड समजतील. आम्ही लोकांच्या स्वप्नांबद्दल बोलतोय अशा शब्दात आदित्यने टीका केली आहे.