Next

आबा, तुम्हीच निवडणूक लढवा, पायावर डोकं ठेवून कार्यकर्ते रडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 02:25 PM2019-09-16T14:25:28+5:302019-09-16T14:27:03+5:30

सांगोल्याचे आमदार  आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते  गणपतराव देशमुख  यांनी तब्बल 11 वेळा  आमदार  होण्याचा विक्रमच आपल्या नावावर केला ...

सांगोल्याचे आमदार  आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते  गणपतराव देशमुख  यांनी तब्बल 11 वेळा  आमदार  होण्याचा विक्रमच आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे एकाच पक्षातून त्यांनी आपल्या विचारांशी ठाम राहून विधानसभा गाजवली.  गणपतराव देशमुख  यांच्या साधेपणाचे अनेक किस्से मीडियात रंगतात.  सांगोल्याची  जनता या वयोवृद्ध आमदारांवर , आपल्या लाडक्या नेत्यावर जीवापाड प्रेम करते. सांगोल्यातील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा जनतेचं हे प्रेम दिसून आलं आहे.   विशेष म्हणजे सभेच्या ठिकाणी शेकापच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर गर्दी करत गणपतराव देशमुख यांच्या पायावरच डोकं ठेवलं. आबा, काहीही झालं तरी यंदाही तुम्हीच निवडणूक लढवा असं म्हणत कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाल्याचंही पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांनी भावुक केललं हे वातावरण पाहून गणपतराव देशमुखही गहिरवले होते.