Next

'ठाकरे' सिनेमाचे पोस्टर न लावल्याने आयनॉक्समध्ये शिवसैनिकांचा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 10:19 AM2019-01-25T10:19:31+5:302019-01-25T10:24:30+5:30

नवी मुंबई, वाशी येथील आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये ‘ठाकरे’ सिनेमाचे पोस्टर न लावल्याने शिवसैनिकांनी येथे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तसंच जोपर्यंत सिनेमाचे ...

नवी मुंबई, वाशी येथील आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये ‘ठाकरे’ सिनेमाचे पोस्टर न लावल्याने शिवसैनिकांनी येथे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तसंच जोपर्यंत सिनेमाचे पोस्टर लावले जात नाही तोपर्यंत थिएटरमध्ये ठिय्या मांडून बसणार, असा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतला होता. थिएटरमध्ये सकाळी 8 वाजता ‘ठाकरे’ सिनेमाचा खेळ होता. पण थिएटरबाहेर 'ठाकरे'चे पोस्टरच न लावल्याने शिवसैनिक संतापले.