Next

प्रवाशांच्या तुलनेत एसटी बसची संख्या कमी | ST Bus Shortage In Maharashtra | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 02:36 PM2021-10-01T14:36:34+5:302021-10-01T14:36:54+5:30

महाराष्ट्राची लालपरी म्हणून एसटी बस ओळखली जाते. सुखरुप प्रवास करण्यासाठी अनेकजण एसटी बसलाच पसंती देतात. मोडकळीस आली असली तरी आदळआपट करत खेडोपाडी प्रवाशांना आपल्या ठिकाणी पोहचवण्याचं काम एसटी चोखपणे करतेय. विद्यार्थ्यांसाठी, गोरगरिबांसाठी एसटी हाच पर्याय असतो. आजही गावोगावी वयोवृद्ध लोक भर उन्हात डोळ्यावर हात ठेऊन एसटीची पाहत उभे असतात. कारण अनेकांना एसटीचाच आधार वाटतो. रेल्वे बंद असताना हीच लालपरी मुंबईकरांसाठीदेखील धावून आली होती.