Next

परमबीर सिंहांचा शोध सुरु, गृहमंत्री म्हणतात... | Maharashtra HM Dilip Walse-Patil on Parambir Singh

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 01:01 PM2021-10-01T13:01:43+5:302021-10-01T13:02:26+5:30

परमबीर सिंह कुठेत? हा गृह विभागाला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रात गृहविभागात खळबळ माजवून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह गेले कुठे? याची कोणालाच माहिती नाही. अनेक दिवसांपासून परमबीर कुठेत याचीच चर्चा होतेय. परमबीर सिंह देश सोडून परदेशात गेले आहेत? हा प्रश्न सध्या एनआयए आणि महाराष्ट्र पोलिसांना पडला आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआए तपास करत आहे. याप्रकरणात चौकशीसाठी एनआयएने परमबीर सिंह यांना अनेकेवळा समन्स पाठवला आहे. पण आजपर्यंत एकही समन्स परमबीर सिंह यांच्यापर्यंत पोहचलं नाही. सर्वठिकाणी अधिकारी जाऊन आले.