जिल्ह्यात अवकाळी पाऊस तथा गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या गहु, चणा, तूर, फळबाग, कांदा, कपाशी, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या, अशी मागणी जिल्हा काँगे्रस कमिटीने केली. ...
कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८८ व्या जयंतीनिमित्त नगर परिषदेद्वारे स्वच्छता रॅली काढण्यात आली. या रॅलीला खा. रामदास तडस यांनी झेंडी दाखवून सुरूवात केली. या जागृती रॅलीद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. ...
पिंपळधरी येथे १२ फेबु्रवारी रोजी वादळी वाऱ्यासह गारपीट झाले. यात गाव बेचिराख झाले. तहसील प्रशासनाने गावात मदत पोहोचविली; पण काहींनी आंदोलनात धन्यता मानली. यास विरोध केला असता तहसीलदारांविरूद्धच गुन्हा दाखल करण्याचा प्रताप केला. ...
शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून निर्माण केलेला निम्न वर्धा प्रकल्प सध्या डोकेदुखी ठरू लागला आहे. कालव्याच्या सदोष कामांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने असंतोष पसरला आहे. ...
शेतांमध्ये टॉवर उभारल्यानंतर दिला जाणारा मोबदला अत्यल्प होता. शिवाय कंत्राटदार मनमानी पद्धतीने तो शेतकऱ्यांना देत होते. याबाबत टॉवर विरोधी कृती समितीने लढा दिला. ...
आज देशातील शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. सरकारला संविधानावर आधारित व्यवस्थाच नाकारायची आहे. शिक्षणाचे खासगीकरण करण्यात येत असून मोठ्या प्रमाणात शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. ...
बाजार समितीच्या यार्डमध्ये लिलाव झाल्यानंतर ठरलेल्या भावावर कायम न राहता प्रती क्विंटल ५०० रुपयांपर्यंत दर कमी दिले जात आहे. व्यापाऱ्यांच्या जीनिंगमध्ये गाडी खाली करताना कापसाच्या गुणवत्तेचे कारण सांगून नागविले जात आहे. ...
गाव तेथे स्मशानभूमी, असा निर्णय घेत शासनाने स्मशानभूमिच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याचे धोरण स्वीकारले आहे. असे असताना वर्धा जिल्ह्यात तब्बल ९०८ गावांत स्मशानभूमिची समस्या डोके वर काढून आहे. ...
ऐतिहासिक पार्श्वभूमी तथा कलावंतांची विपुलता असलेले वर्धा शहर नाट्यगृहापासून वंचित होते. ही उणीव आता भरून निघणार आहे. शासनाने वर्धेतील नाट्यगृहाला हिरवी झेंडी दिली आहे. ...
महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या कर्मभूमित सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे, ही आनंदाची बाब आहे. या कार्यात निश्चितच चांगले यश मिळेल अशी मला खात्री आहे. ...