श्रीलंकेविरुद्ध नागपुरात दुसऱ्या कसोटीत चौथ्याच दिवशी विजय नोंदविल्यानंतर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने फावल्या वेळेचा सदुपयोग केला. विजयात मोलाची भूमिका वठविणाऱ्या अश्विनने मित्रांसोबत पेंच राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारी केली. ...
राष्टÑीय-राज्य महामार्गांलगत असलेल्या वनक्षेत्रातून भरकटून रस्ता ओलांडताना नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत एकूण सहा बिबट्यांचा गेल्या अकरा महिन्यांत अपघाती मृत्यू झाला आहे. अवघ्या तासाभरात कित्येक किलोमीटर अंतर कापणाºया बिबट्यासारख्या चपळ वन्यप्राण्यालाही ...
कारंजा घाडगे तालुक्यातील अंभोरा येथे गुरुवारी रात्री गणपत उईके यांच्या गोठ्यात शिरून गोठ्यातील बकरीवर हल्ला करून गंभीर जखमी केले. आवाज येताच मालक गणपत उईके याच्यासह गावकरी धावले असता वाघ पळून गेला. यात बकरी जखमी होवून जागीच मरण पावली. ...
वन्यजिवांचा शिकारींपासून बचाव करता यावा, यासाठी ‘फॉरेस्ट मेजर’ हा उपक्रम मेळघाट व्याघ्र प्रकल्प राबविणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे १०० जणांची निवड केली जाणार असून, यात विद्यार्थ्यांना प्राधान्य राहील. ...
गेल्या वर्षभरात ७ वाघ आणि सुमारे १२ विबट्यांचा मृत्यू शेतातील कुंपणात सोडलेल्या वीज प्रवाहामुळे झाल्याची धक्कादायक नोंद वन खात्याच्या लेखी आहे. जंगलालगत मानवाचे वास्तव्य धोक्याचे आहेच ...