अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी

धावांचा यशस्वी पाठलाग करत हैदराबादच्या संघाने सलग चौथ्या विजयाची नोंद केली.

By सुशांत जाधव | Updated: April 26, 2026 00:02 IST2026-04-25T23:53:24+5:302026-04-26T00:02:36+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 RR vs SRH Ishan Kishan And Abhishek Sharma Power Sunrisers Hyderabad to A 5 Wicket Win Over Rajasthan Royals | अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी

अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी

Sunrisers Hyderabad to A 5 Wicket Win Over Rajasthan Royals : अभिषेक शर्मा आणि ईशान किशन याच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने जयपूरच्या घरच्या मैदानात खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सला ५ विकेट्सनी पराभूत केले.  शनिवारी सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगेलल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीचं विक्रमी शतक आणि ध्रुव जुरेलच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ बाद २२८ धावा करत सनरायझर्स हैदराबादसमोर २२९ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा यशस्वी पाठलाग करत हैदराबादच्या संघाने सलग चौथ्या विजयाची नोंद केली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

वैभव सूर्यवंशीचं धमाकेदार शतक, ध्रुव जुरेलची कडक खेळी

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ नियमित कर्णधार पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरला. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर यशस्वी जैस्वालच्या रुपात संघाने पहिले यश मिळवले. मग वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल जोडी जमली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६२ चेंडूत ११२ धावांची दमदार भागीदारी रचली. ध्रुव जुरेल ३५ चेंडूत ५१ धावांची खेळी करून परतल्यावर वैभव सूर्यवंशीनं आयपीएल कारकिर्दीतील आपले दुसरे शतक झळकावले. त्याने ३७ चेंडूत १०३ धावांची खेळी साकारली. डेव्हॉन फरेराने १६ चेंडूत केलेल्या ३३ धावांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर राजस्थानच्या संघाने धावफलकावर २२८ धावा लावल्या. सनरायझर्सच्या संघाकडून गोलंदाजीत  एशान मलिंग याने सर्वाधिक २ तर प्रफुल हिंगे, पॅट कमिन्स, साकीब हुसेन आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.

DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास

अभिषेकसह ईशानचा शानदार शो

धावांचा पाठलाग करताना ट्रॅविस हेडच्या रुपात अवघ्या ७ धावांवर सनरायझर्स हैदराबादच्या संघाला पहिला धक्का बसला. मग अभिषेक शर्मा आणि ईशान किशन जोडी जमली. या दोघांपैकी एकालाही शतकी डाव साधला आला नाही. पण दोघांची वादळी अर्धशतकी खेळी वैभव सूर्यवंशीच्या शतकावर भारी पडली. या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी फक्त ५५ चेंडूत १३२ धावा केल्या. ही भागीदारी सामना हैदराबादच्या बाजून सेट करणारी अशी होती. अभिषेक शर्मानं २९ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५७ धावांची खेळी केली. ईशान किशन याने ३१ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७४ धावा कुटल्या. याशिवाय हेन्री क्लासेन २९ (३४) आणि नितीशकुमार रेड्डी ३६ (१८)  यांनी उपयुक्त खेळीसह संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सलिल अरोरानं षटकार मारत ९ चेंडू आणि पाच विकेट्स राखून संघाचा विजय निश्चित केला. राजस्थानकडून गोंलंदाजीत जोफ्रा आर्चर आणि ब्रिजेश शर्मा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेलल्या. याशिवाय डेव्हॉन फरेरा याने एक विकेट पटकावली.

Web Title : अभिषेक, ईशान चमके! सूर्यवंशी का शतक बेकार; SRH ने RR को हराया।

Web Summary : अभिषेक शर्मा और ईशान किशन के अर्धशतकों की बदौलत सनराइजर्स हैदराबाद ने जयपुर में राजस्थान रॉयल्स को 5 विकेट से हराया। वैभव सूर्यवंशी के विस्फोटक शतक और ध्रुव जुरेल के अर्धशतक के बावजूद, एसआरएच ने लगातार चौथी जीत दर्ज की।

Web Title : Abhishek, Ishan shine! Suryavanshi's century in vain; SRH beats RR.

Web Summary : Abhishek Sharma and Ishan Kishan's fifties powered Sunrisers Hyderabad to a 5-wicket victory over Rajasthan Royals in Jaipur. Despite Vaibhav Suryavanshi's explosive century and Dhruv Jurel's fifty, RR's 228 wasn't enough as SRH chased it down for their fourth consecutive win.