वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 23:44 IST2026-04-25T23:41:26+5:302026-04-25T23:44:48+5:30

पुण्यातील कात्रज भागात लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेल्या वादातून तेजस पिलाने या २४ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली.

Murdered with a sharp weapon to avenge a fight over dancing at a wedding procession | वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ

वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ

लग्नाची वरात, डीजेचा आवाज आणि आनंदाचं वातावरण... पण याच वरातीत नाचण्यावरून झालेलं भांडण एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. पुण्याच्या कात्रज भागात चुलत भावाच्या लग्नात नाचण्यावरून झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी २४ वर्षीय तेजस पिलाने याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी वेगाने तपास करत चार जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नेमकी घटना काय?

२५ एप्रिल रोजी कात्रज सर्व्हिस रोडवर तेजस पिलाने हा तरुण रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. पोलिसांनी त्याला तातडीने भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेजसच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली.

नाचण्यावरून वादाची ठिणगी

तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, तेजसचे त्याच्याच नातेवाईकांशी काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. पोलिसांनी थेट वेल्ह्याजवळील कोंढवाळे गाव गाठले. तिथे धक्कादायक वास्तव समोर आले. काही दिवसांपूर्वी एका भावाच्या लग्नाची वरात निघाली होती. या वरातीत नाचण्यावरून तेजस आणि त्याचा चुलत भाऊ विशाल खोपडे यांच्यात जोरदार भांडण झाले होते. हाच राग विशालच्या मनात होता.

गाठून केला गेम!

लग्नातील त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी विशालने आपल्या साथीदारांसह तेजसचा काटा काढण्याचे ठरवले. २५ एप्रिलला संधी मिळताच आरोपींनी तेजसवर धारदार शस्त्राने सपासप वार केले आणि त्याला रस्त्यावर सोडून पळ काढला. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणात तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पाठलाग करून चार जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विशाल खोपडे (वय २२ वर्षे), अभिषेक खोपडे (वय २३ वर्षे), हरिश्चंद्र धुळे (वय ४३ वर्षे), आदिनाथ कसबे (वय १९ वर्षे) अशी आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title : बारात में नाचने पर हत्या: पुणे में चचेरे भाई ने जान ली।

Web Summary : पुणे में शादी में नाचने को लेकर हुए विवाद में एक युवक की हत्या कर दी गई। बदला लेने की भावना से प्रेरित होकर चचेरे भाई ने तेज हथियारों से हमला किया। पुलिस ने अपराध में शामिल चार लोगों को गिरफ्तार किया।

Web Title : Dance at wedding leads to murder: Pune relative kills cousin.

Web Summary : A young man was murdered in Pune over a dance-related argument at a wedding. The cousin, fueled by revenge, fatally attacked him with sharp weapons. Police arrested four individuals involved in the crime.