एसटी महामंडळातील राज्यभरात काही महिला वाहकांचे अचानक गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने १४ जुलै रोजी समोर आणताच एकच खळबळ उडाली. याविषयी तीव्र पडसाद उमटले होते. ...
चालत्या बसमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने पेठपिंपळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी नरवटे यांचा मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पालम ते गंगाखेड प्रवासादरम्यान घडली. ...
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी हे राज्य शासनाचे कर्मचारी नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांना सातवा आयोग लागू होत नाही, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत सांगितले. ...
राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी द्या किंवा स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, असे साकडे कन्नड आगारातील ११२ कर्मचार्यांनी व सिल्लोडमधील एका कर्मचार्याने मुख्यमंत्र्यांना घातले आहे. ...
तुटपुंज्या वेतनामुळे झालेली बिकट आर्थिक परिस्थिती, सततचा तणाव यामुळे नाशिकच्या पंचवटी बस आगारातील कर्मचाºयांचे मानसिक संतुलन ढासळले असून, त्यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल व विरोधी पक्षनेत्यांकडे स्वेच्छामरणाची परवानगी मागितली आहे़ या आगारातील सुमारे सव् ...
खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एसटी महामंडळाने सुरू केलेल्या शिवशाही बसेस काही ठिकाणी नफ्यात तर काही ठिकाणी तोट्यात धावत आहेत़ दरम्यान, नांदेड येथून चालविण्यात येणारी पुणे शिवशाही बस जवळपास दीड ते २ लाख रूपये तोट्यात धावत आहे़ तर ...
तुटपुंज्या वेतनामुळे आर्थिक कोंडी होण्यासोबतच मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. एसटीचे शासनात विलिनीकरण झाल्यास यातून मुक्तता होऊ शकते. हीच मागणी घेऊन ‘संघर्ष’ ग्रुपने लढा तीव्र केला आहे. ...
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्याची सूचना करण्यात आली; परंतु प्रवाशांच्या तिकिटाच्या रकमेतून जमा झालेली रक्कम जुन्या नोटांमध्ये बदलण्याचा उद्योग एसटी महामंडळातील काही अधिकारी-कर्मचार्यांनी केला. ...