उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं

चेन्नईच्या संघाने २०१९ नंतर पहिल्यांदाच १८० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला अन्...

By सुशांत जाधव | Updated: May 10, 2026 20:23 IST2026-05-10T20:07:51+5:302026-05-10T20:23:53+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 CSK vs LSG Chennai Super King Break The Chase Jinx Won by 5 wkts vs Lucknow Super Giants First Team Out Of The Playoffs Race | उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं

उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं

चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानात अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात यजमान चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने २०४ धावांचा यशस्वी पाठलाग करुन दाखवला. हा सामना ५ विकेट्स राखून जिंकत CSK च्या संघाने प्लेऑफ्सच्या शर्यतीतील आपली आस कायम ठेवली आहे. दुसरीकडे या पराभवासह लखनौ सुपर जाएंट्सचा यंदाच्या हंगामातील प्रवास संपुष्टात आला आहे. लखनौच्या संघाने दिलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ससाठी १८० पेक्षा अधिक धावा करताना पराभवाचा दुष्काळ संपवण्याचे आव्हान होते. उर्विल पटेल याच्या विक्रमी अर्धशतकासह CSK अखेर हा डाव साध्य केला आहे. २०१९ नंतर पहिल्यांदाच चेन्नईच्या संघाने १८० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करुन दाखवत गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

LSG कडून जॉस इंग्लिसचा धमाका

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जॉस इंग्लिस याने ३३ चेंडूत १० चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने केलेल्या ८५ धावा आणि शाहबाझ अहमदने २५ चेंडूत केलेल्या ३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ४३ धावांच्या जोरावर लखनौ सुपर जाएंट्सच्या समघाने निर्धारित २० षटकात ८ बाद २०३ धावा केल्या होत्या. चेन्नईकडून जेमी ओवर्टन याने सर्वाधिक ३ तर अंशुल कंबोज याने २ आणि नूर अहमद याने एक विकेट आपल्या खात्यात जमा केली. 

CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव

CSK समोर होतं मोठं आव्हान 

या धावसंख्येचा पाठलाग करणं चेन्नई सुपर किंग्ससाठी मोठं आव्हानच होते. कारण २०१९ पासून CSK चा संघ १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना अडखळताना दिसला होता. संजू सॅमसन १४ चंडूत २८ धावा करून परतल्यावर पुन्हा त्यांच्यावर तिच वेळ येते का? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण उर्विल पटेल याने विक्रमी अर्धशतकी खेळीसह लखनौच्या संघाला बॅकफूटवर ढकणारी खेळी साकारली. त्याने २३ चेंडूत २ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या. याशिवाय ऋुतराज गायकवाडनं २८ चेंडूत ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. 

एका पाठोपाठ झेल सोडले अन् LSG वर आली स्पर्धेतून आउट होण्याची वेळ

दोघांनी आपली भूमिका बजावल्यावर अखेरच्या षटकात इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात मैदानात उतरलेल्या प्रशांत वीर याने शिवम दुबेच्या साथीनं ४ चेंडू ५ विकेट्स राखून संघाला विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकात लखनौच्या गोलंदाजांनी सामन्यात ट्विस्ट आणले. पण आवेश खानच्या गोलंदाजीवर दिग्वेश राठी आणि निकोलस पूरन यांनी मोक्याच्या क्षणी प्रशांत वीरचे दोन झेल सोडले. परिणामी सामन्यात येण्याची आणि स्पर्धेत टिकून राहण्याची जी शेवटची आस होती ती संपली. या पराभवासह लखनौ हा यंदाच्या हंगामातून प्लेऑफ्सच्या शर्यतीतू नबाद होणारा पहिला संघ ठरला आहे.

Web Title : उर्विल पटेल की रिकॉर्ड पारी: CSK ने LSG को असंभव लक्ष्य का पीछा करते हुए हराया!

Web Summary : चेन्नई में CSK ने रोमांचक मुकाबले में LSG के खिलाफ 204 रनों का लक्ष्य हासिल किया और 5 विकेट से जीत दर्ज की। उर्विल पटेल के रिकॉर्ड अर्धशतक ने CSK की जीत में अहम भूमिका निभाई, जिससे प्लेऑफ की उम्मीदें बरकरार रहीं और लखनऊ टूर्नामेंट से बाहर हो गया। इस जीत से CSK अंक तालिका में पांचवें स्थान पर पहुंच गई।

Web Title : Urvil Patel's Record Innings: CSK Eliminates LSG Chasing Improbable Target!

Web Summary : CSK chased down a 204-run target against LSG in a thrilling Chepauk match, winning by 5 wickets. Urvil Patel's record-breaking fifty powered CSK's victory, keeping their playoff hopes alive and eliminating Lucknow from the tournament. This win propelled CSK to fifth place in the points table.