कोयनानगर परिसरात शनिवारी रात्री ९ वाजून ३८ मिनिटांनी २.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. अतिसौम्य प्रकाराचा हा धक्का होता. येथे आठवड्यात दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. ...
मराठा आरक्षणाच्याबाबतीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयात सरकारच्यावतीने ताकदीने बाजू मांडली होती. मात्र सध्याचे सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना कमी पडले आहे. राज्य सरकारने तत्काळ ठोस पावले उचलावीत अशी मागणी खासदार उद ...
देशात आणि राज्याच्या इतर भागात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती अमलात आणली जात आहे.त्यामुळे या परिणामकारक उपचार पद्धतीचा वापर सिंधुदुर्ग जिल्ह्यात करा. अशी मागणी एका पत्राद्वारे भाजपा आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असून पूर्व भागात मात्र चांगलाच बरसू लागला आहे. यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. तर धरण क्षेत्रात अत्यल्प पाऊस होत आहे. कोयनेत १०३.६३ टीएमसी साठा झाला होता. ...
सातारा:जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आणि मृतांचा आकडा अत्यंत वेगाने वाढतच असून, गुरुवारी एकाच दिवसात तब्बल २५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. तर नवे ८०० रुग्ण आढळून आले. यामुळे बाधितांची संख्या २२ हजार १४७ वर पोहोचली असून, बळींचा आकडा ५८२ झाला आहे. ...
कोरोनाची महामारी जिल्ह्यामध्ये सर्वत्र पसरलेली आहे. ही महामारी रोखण्यासाठी प्रशासन आपल्या पातळीवर प्रयत्न करत असले तरी देखील आता जनतेचेही ही प्रशासनाला साथ मिळू लागली आहे. प्रशासनाने कोणतेही आवाहन न करताच जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये तसेच गावांमध्ये ...