corona virus : जिल्ह्यात बाधितांचा आकडा २२ हजारांवर, आणखी २५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 12:38 PM2020-09-11T12:38:02+5:302020-09-11T12:39:16+5:30

सातारा:जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आणि मृतांचा आकडा अत्यंत वेगाने वाढतच असून, गुरुवारी एकाच दिवसात तब्बल २५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. तर नवे ८०० रुग्ण आढळून आले. यामुळे बाधितांची संख्या २२ हजार १४७ वर पोहोचली असून, बळींचा आकडा ५८२ झाला आहे.

corona virus: Number of infected people in the district rises to 22,000, 25 more die | corona virus : जिल्ह्यात बाधितांचा आकडा २२ हजारांवर, आणखी २५ जणांचा मृत्यू

corona virus : जिल्ह्यात बाधितांचा आकडा २२ हजारांवर, आणखी २५ जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात बाधितांचा आकडा २२ हजारांवर, आणखी २५ जणांचा मृत्यूबळींची संख्या ५८२ वर, ८९३ कोरोना मुक्त

सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आणि मृतांचा आकडा अत्यंत वेगाने वाढतच असून, गुरुवारी एकाच दिवसात तब्बल २५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. तर नवे ८०० रुग्ण आढळून आले. यामुळे बाधितांची संख्या २२ हजार १४७ वर पोहोचली असून, बळींचा आकडा ५८२ झाला आहे.

जिल्हात बुधवारी रात्री ८१७ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. त्यामध्ये कऱ्हाड तालुक्यात १८०, सातारा-१८७, पाटण-३६, वाई- ८३, खंडाळा-५४, खटाव-५२, माण- १७, कोरेगाव-९१, जावळी-३८, महाबळेश्वर-१४, फलटण-५२ जणांचा समावेश आहे.

त्याचबरोबर २५ जणांचा मृत्यू झालेल्यांमध्ये साताऱ्यातील कामाठीपुरा येथील ४३ वर्षीय महिला, कुसवडे सातारा येथील ४४ वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील ६० वर्षीय महिला, शाहुनगर येथील ४५ वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील ५५ वर्षीय पुरुष, केसरकर पेठ येथील ८३ वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील ५८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

चीचणी येथील ४२ वर्षीय महिला, अंबेरी कोरेगाव येथील ७५ वर्षीय पुरुष, चाळकेवाडी सातारा येथील ४८ वर्षीय महिला, वडूज खटाव येथील ७० वर्षीय महिला, राऊतवाडी कोरेगाव येथील ५४ वर्षीय पुरुष, रविवार पेठ फलटण येथील ८५ वर्षीय पुरुष, कोल्हापूर नाका कराड येथील ६५ वर्षीय पुरुष, कुंभारगाव पाटण येथील ७५ वर्षीय पुरुष, अपशिंगे सातारा येथील ६२ वर्षीय पुरुष, कोळेश्वर कराड येथील ७८ वर्षीय पुरुष, मलकापूर कराड येथील २८ वर्षीय पुरुष, कार्वे नाका कराड येथील ६७ वर्षीय पुरुष, बेलवडे बु येथील ८२ वर्षीय पुरुष, सोमवार पेठ कराड येथील ५८ वर्षीय पुरुष, औंध येथील ४५ वर्षीय पुरुष, वाजेगाव खानापूर येथील ३९ वर्षीय पुरुष, सदरबझार सातारा येथील ३० वर्षीय पुरुष, कराड येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

१३ हजार कोरोनामुक्त

जिल्ह्यात गुरूवारी एका दिवसात तब्बल ८९३ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे नागरिकांनाही दिलासा मिळतोय. तसेच आत्तापर्यंत १३ हजार ८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: corona virus: Number of infected people in the district rises to 22,000, 25 more die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.