वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये वालाच्या पिकांची लागवड केली आहे. मात्र, रानगवे येऊन वालाच्या पिकांची नासधूस करत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ...
रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे हे २९ मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याप्रसंगी त्यांच्यासोबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अन्य प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. ...
जिल्ह्यातील अलिबाग, रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी व रेवदंडा खाडीपात्रातील २२ तर महाड तालुक्यातील सावित्री नदीपात्रातील पाच वाळूगटांची ई-लिलाव प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्यात आली. ...
तालुक्यातील फणसाड अभयारण्यात १२ रानगवे आढळले असून यापूर्वी कधीही असे रानगवे दृष्टीस पडले नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. फणसाड अभयारण्यात प्रथमच रानगवे आल्याने पर्यटकांसाठी हे आकर्षण ठरणार आहेत. ...
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील कवेळे धरणाला गळती लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. धरणाच्या कालव्याच्या बंदिस्त नलिका अनेक ठिकाणी कचरा व मुळ्या जाऊन चोकअप झाल्या आहेत. ...
महाडमध्ये गेली दोन दिवसांपासून पेट्रोल पंपावर पेट्रोल टंचाई निर्माण झाली आहे. महाड शहरालगत जवळपास पाच पेट्रोल पंप आहेत, यापैकी एकाच पंपावर पेट्रोल उपलब्ध असल्याने या पंपावर चालकांनी मोठी गर्दी केली होती. ...
हवामानातील बदलामुळे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये मासळीचा दुष्काळ पडल्याने मासेमारी करता न आल्याने मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. ...