भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा येत्या नोव्हेंबर महिन्यात आयोजित करणे शक्य नाही. आणखी किमान पाच महिन्यांचा तरी कालावधी मिळायला हवा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले आहे. ...