मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 01:31 IST2026-05-02T01:30:19+5:302026-05-02T01:31:56+5:30

इराणने केलेल्या हल्ल्यांत अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील लष्करी तळांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकत्या आलेल्या नव्या तपासाशी संबंधित वृत्तानुसार, इराणने हे हल्ले अमेरिकेच्या अत्यंत महत्वाच्या तळांवर केले. 

Big news Iran broke America's back in the Middle East Military bases in 8 countries destroyed, everything from radar to aircraft destroyed | मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!

मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!

मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रयल आणि इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. इराणने केलेल्या हल्ल्यांत अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील लष्करी तळांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकत्या आलेल्या नव्या तपासाशी संबंधित वृत्तानुसार, इराणने हे हल्ले अमेरिकेच्या अत्यंत महत्वाच्या तळांवर केले. 

८ देशांतील १६ लष्करी तळ उद्धवस्त - 
'सीएनएन'ने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार, इराणच्या हल्ल्यात मध्यपूर्वेतील ८ देशांमध्ये असलेली अमिरिकेची किमान १६ लष्करी तळ उद्धवस्त झाली आहेत. महत्वचे म्हणजे यांपैकी काही तळांचे एवढे प्रचंड नुकसान झाले आहे की, त्यांचा छोट्या मोठ्या गोष्टींसाठीही वापर केला जाऊ शकणार नाही. सॅटेलाईट फोटो आणि आखाती देशांतील काही अधिकाऱ्यांच्या मुलाखतींतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

इराणने अमेरिकेची रडार यंत्रणा, पायाभूत सुविधा अन् विमानांना केलं लक्ष्य - 
महत्वाचे म्हणजे, या हल्ल्यांत इराणने, अमेरिकेची प्रगत रडार यंत्रणा, दळणवळणाच्या पायाभूत सुविधा आणि विमानांना लक्ष्य केले आहे. हे मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी तळांचा भाग आहेत. या नुकसानीमध्ये महत्त्वाच्या सुविधांचा समावेश असून, यामुळे या प्रदेशातील अमेरिकेच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अमेरिकेला २५ अब्ज डॉलर्सचा फटका -
संबंधित वृत्तानुसार, नष्ट झालेल्या सुविधा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी अथवा त्यांची दुरुस्ती करण्यासाठी अमेरिकेला प्रचंड खर्च येईल. पेंटागनचे कंट्रोलर जूल्स जे हर्स्ट III यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत इराण युद्धात अमेरिकेचे सुमारे २५ अब्ज डॉलर्स खर्च झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात हा आकडा ४० ते ५० अब्ज डॉलर्सपर्यंतही पोहोचू शकतो.

 

Web Title : ईरान ने मध्य पूर्व में अमेरिका को पंगु बनाया: ठिकाने नष्ट, अरबों का नुकसान!

Web Summary : ईरान के हमलों ने मध्य पूर्व में अमेरिकी सैन्य ठिकानों को गंभीर रूप से क्षतिग्रस्त कर दिया, जिससे रडार सिस्टम, बुनियादी ढांचे और विमान प्रभावित हुए। आठ देशों में सोलह ठिकाने प्रभावित हुए, जिससे अमेरिका को अनुमानित 25 अरब डॉलर का नुकसान हुआ।

Web Title : Iran cripples US in Middle East: Bases destroyed, billions lost!

Web Summary : Iran's attacks severely damaged US military bases in the Middle East, impacting radar systems, infrastructure, and aircraft. Sixteen bases across eight countries were affected, costing America an estimated $25 billion.