भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 01:36 IST2026-05-02T01:36:23+5:302026-05-02T01:36:55+5:30

आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.

Massive fire in Bhusawal Six houses burnt to ashes Four goats die in blaze | भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू

भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू

 

भुसावळ :शहरातील काझी प्लॉट परिसरात शुक्रवारी (दि. १ मे) रात्री साडेनऊ ते पावणे दहाच्या सुमारास भीषण आग लागून सहा घरे जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत घरातील संपूर्ण संसार जळून खाक झाला. या दुर्घटनेत चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला.

आग लागल्याचे कळताच नगरपालिका अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिकेच्या चार अग्निशमन बंबांसह एक प्रेशर ट्रंकरचा वापर करण्यात आला. मात्र, रात्री उशिरापर्यंत जळालेल्या घरांमधून आगीची धग कायम असल्याचे दिसून येत होते. स्थानिक नागरिकांनीही बचाव कार्यात सहकार्य केले. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : भुसावल में भीषण आग: छह घर खाक, चार बकरियां मरीं

Web Summary : भुसावल के काज़ी प्लॉट इलाके में शुक्रवार रात भीषण आग लगने से छह घर जलकर राख हो गए। आग में चार बकरियों की भी मौत हो गई। आग बुझाने के लिए दमकल की चार गाड़ियां लगीं। कारण अज्ञात है।

Web Title : Devastating Fire in Bhusawal: Six Homes Destroyed, Goats Killed

Web Summary : A fierce fire in Bhusawal's Kazi Plot gutted six homes on Friday night. The blaze, which also killed four goats, required four fire engines and a pressure tanker to extinguish. The cause is still under investigation.