राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
अजित दादांचा प्रचार करण्यासाठी गुंड फोन करून धमक्या देत आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर केला आहे. ते माध्यमांसोबत बोलत होते. ...
एकमेकांना धमक्या, इशारे, लायकी आदी गोष्टींमुळे राजकीय वातावरण या उकाड्यात आणखी तापू लागले आहे. मुळ विरोधकाला सोडून हे चारही गट एकमेकांवरच टीका करण्यात व्यस्त झाले आहेत. ...